Join us

लेडी लव्हसोबत आदिश वैद्यचा रोमॅण्टिक फोटो व्हायरल; अभिनेत्याची गर्लफ्रेंडही आहे प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 16:58 IST

Adish Vaidya: आदिश वैद्य सोशल मीडियावर सक्रीय असून वरचेवर चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. यात अनेकदा तो त्याच्या प्रेयसीसोबतचे फोटो वा व्हिडीओदेखील शेअर करत असतो.

'बिग बॉस मराठी'च्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता म्हणजे आदिश वैद्य. मराठीसह हिंदी मालिकांमध्ये काम करणारा आदिश सोशल मीडियावर कायमच चर्चेत येत असतो. यावेळीदेखील तो असाच चर्चेत आला आहे. परंतु, यावेळी कोणत्याही मालिकेमुळे वा नव्या प्रोजेक्टमुळे नव्हे तर त्याच्या लेडी लव्हमुळे चर्चेत येत आहे.

आदिश वैद्य सोशल मीडियावर सक्रीय असून वरचेवर चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. यात अनेकदा तो त्याच्या प्रेयसीसोबतचे फोटो वा व्हिडीओदेखील शेअर करत असतो.यावेळीदेखील त्याने असाच एक रोमॅण्टिक फोटो शेअर करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. विशेष म्हणजे आदिशची गर्लफ्रेंडदेखील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

आदिश लोकप्रिय अभिनेत्री रेवती लेले हिला डेट करत आहे. सोशल मीडियावर या दोघांनी एकमेकांसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. यावेळी आदिशने शेअर केलेल्या फोटोमध्ये ही जोडी रोमॅण्टिक अंदाजात दिसून येत आहे.

दरम्यान, गेल्या कित्येक काळापासून ही जोडी एकमेकांना डेट करत असून दोघांच्या कुटुंबियांचीदेखील या नात्याला परवानगी आहे. आदिश 'रात्रीस खेळ चाले', 'बिग बॉस मराठी' या कार्यक्रमांमध्ये झळकला आहे. तसंच तो हिंदी कलाविश्वात जास्त सक्रीय आहे. तर, रेवती 'गुलमोहर', 'स्वामिनी', 'वर्तुळ', 'विठू माऊली' या मालिकांमध्ये झळकली आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजनटिव्ही कलाकारबिग बॉस मराठी