Join us

मनोज जोशीची नवी मालिका ‘मंगलम दंगलम’ रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 17:26 IST

संजीव यांची पत्नी संगीता संकलेचा (भूमिका साकारली आहे अंजली गुप्ता यांनी) ही एक उत्साही गृहिणी आहे. अर्जुनची आई चारुलता कुट्टी (भूमिका साकारली आहे अनिता कुलकर्णी यांनी) ही इंदूरमध्ये एक कायद्याची प्राध्यापक आहे.

छोट्या पडद्यावर ‘हसते रहो इंडिया’ या शोच्या यशानंतर एक नवीन विनोदी मालिका  ‘मंगलम दंगलम – कभी प्यार कभी वार’. रसिकांच्या  भेटीला येणार आहे. करणवीर शर्मा नागार्जुन कुट्टी ऊर्फ अर्जुन हा एक देखणा, उपवर तरुण एक वकील आहे आणि इंदूरमधील एका दाक्षिणात्य कुटुंबातला आहे. त्याची भेट होते एका साध्या पण उन्मुक्त व्यक्तिमत्व असलेल्या रुमी या मुलीशी, जिची भूमिका साकारली आहे मनीषा रावत हिने. ही खेळकर मुलगी तिच्या संस्कारांमध्ये रुजलेली आहे. एक उच्च मध्यमवर्गीय व्यापारी असलेल्या तिच्या वडिलांनी तिला एखाद्या राजकन्येसारखी वाढवली आहे आणि तिचेही त्यांच्यावर खूप प्रेम आहे.  इतके की, ती तिच्या आयुष्यातला कुठलाही निर्णय त्यांच्या परवानगी शिवाय घेत नाही. अर्जुन आणि रुमी एकमेकांच्या प्रेमात पडतात पण जेव्हा अर्जुन संजीव संकलेचा (भूमिका साकारली आहे मनोज जोशी यांनी) यांच्याकडे, म्हणजेच रूमीच्या वडिलांकडे तिचा हात मागायला जातो, तेव्हा समस्या निर्माण होते. मग सुरु होतो संजीव आणि अर्जुन यांच्यातला संघर्ष.अर्जुन रुमीला घेऊन जाऊ इच्छितो, तर संजीव तिला जाऊ देत नाहीत. 

संजीव यांची पत्नी संगीता संकलेचा (भूमिका साकारली आहे अंजली गुप्ता यांनी) ही एक उत्साही गृहिणी आहे. अर्जुनची आई चारुलता कुट्टी (भूमिका साकारली आहे अनिता कुलकर्णी यांनी) ही इंदूरमध्ये एक कायद्याची प्राध्यापक आहे. ती एक शिस्तप्रिय आणि परंपरावादी आई आहे, तर अर्जुनचे वडील वेंकटेश कुट्टी (भूमिका साकारली आहे अभय कुलकर्णी यांनी) हे एक निवृत्त वकील आणि सल्लागार आहेत, ज्यांना त्यांचा सारा वेळ संगीताची आराधना करण्यात आणि चारुलतासमोर विनोद करण्यात जातो. इतर महत्वाच्या भूमिका आणि कलाकार असे आहेत. कृतिका शर्मा (शुभा खोटे) या रूमीच्या आजी, अर्जुनची बहिण कृतिका शर्मा आणि प्रविष्ट मिश्रा हा रुमीचा भाऊ. ‘मंगलम दंगलम’ ही गडबड गोंधळाने परिपूर्ण अशी ही हसवाहसवी म्हणजे प्रियाराधन करणारा एक तरुण त्याच्या होणा-या सासरेबुवांना जिंकेल अशा आशेमधला प्रवास आहे.  

टॅग्स :मंगलम दंगलममनोज जोशी