Join us

मनोज वाजपेयीने सांगितला हा भयानक अनुभव, वाचून येईल अंगावर काटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2020 19:30 IST

मनोज वाजपेयीचा एका चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी मृत्यूच्या दाढेतून परतला होता.

ठळक मुद्देया चित्रपटाचे चित्रीकरण मनालीमध्ये करण्यात आले होते. त्यावेळी प्रचंड थंडी होती. या थंडीमुळे चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी दोन वेळा मी मरता मरता वाचलो. या चित्रपटाचे 60 दिवसांचे चित्रीकरण माझ्या कायम स्मरणात आहे.

१९९८ मध्ये प्रदर्शित राम गोपाल वर्मा यांच्या ‘सत्या’ने मनोज वाजपेयी या नावाला नवी ओळख दिली. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. अमृता प्रीतम यांची गाजलेली कादंबरी ‘पिंजर’वर आधारित ‘पिंजर’ याच नावाच्या चित्रपटासाठी मनोजला दुसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. प्रकाश झा यांच्या ‘राजनीति’ या चित्रपटानंतर मनोज वाजपेयीच्या नावाची चर्चा होऊ लागली आणि बॉलिवूडमध्ये त्याला एक नवी ओळख मिळाली. आज बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्यांमध्ये त्याची गणना केली जाते. 

मनोज वाजपेयीचा एका चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी मृत्यूच्या दाढेतून परतला होता. त्यानेच ही गोष्ट सोशल मीडियाद्वारे त्यांच्या चाहत्यांना सांगितली आहे. मनोजने त्याच्या 1971 या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट केले असून त्यासोबत एक खास गोष्ट लिहिली आहे. ही गोष्ट वाचून त्याच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे. हा चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याने लिहिले आहे की, काही चित्रपट बनवताना निर्माण झालेल्या आठवणी तुम्ही आयुष्यभर विसरू शकत नाही. 1971 या चित्रपटासाठी मला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. या चित्रपटाचे चित्रीकरण मनालीमध्ये करण्यात आले होते. त्यावेळी प्रचंड थंडी होती. या थंडीमुळे चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी दोन वेळा मी मरता मरता वाचलो. या चित्रपटाचे 60 दिवसांचे चित्रीकरण माझ्या कायम स्मरणात आहे. अमित अमृत सागरने दिग्दर्शित केलेला आणि पियूष मिश्राची कथा असलेला हा चित्रपट मी कधीच विसरू शकत नाही. दीपक डोबरियालने या चित्रपटाद्वारे त्याच्या करियरची सुरुवात केली होती.

मनोज वाजपेयीची द फॅमिली मॅन ही वेबसिरीज काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. यात मनोज वाजपेयीने साकारलेल्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. या वेबसिरिजचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

टॅग्स :मनोज वाजपेयी