Join us
Daily Top 2Weekly Top 5

'करिअर बर्बाद करायचंय का?' पत्नीचा सल्ला ऐकला असता तर मनोज बाजपेयी नसता 'फॅमिली मॅन'चा चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 13:35 IST

Manoj bajpayee: मनोजने 'फॅमिली मॅन' करु नये असं त्याच्या पत्नीला वाटत होतं.

मनोज बाजपेयी(manoj bajpayee) यांच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरलेली वेब सीरिज म्हणजे फॅमिली मॅन (family man). या सीरिजमुळे मनोज बाजपेयी तुफान लोकप्रिय झाले. या सीरिजमुळे त्यांना एक वेगळी ओळख मिळाली. आजदेखील ही सीरिज प्रेक्षक आवर्जुन पाहतात. परंतु, सुरुवातीला त्यांनी ही सीरिज करु नये असा सल्ला त्यांची पत्नी शबाना रजा हिने दिला होता. अलिकडेच एका मुलाखतीमध्ये त्यांनी हा किस्सा शेअर केला.

सध्या हा अभिनेता त्याच्या 'सिर्फ एक बंदा काफी है' या सिनेमामुळे चर्चेत येत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने त्यांनी इंडियन एक्स्प्रेसला मुलाखत दिली. यावेळी बोलत असताना त्याने फॅमिली मॅनचा किस्सा शेअर केला.

"मला मुकेश छाबडा यांनी फोन केला आणि राज व डीके यांना तुला भेटायचंय. त्यांच्याकडे एका वेब सीरिजची स्क्रिप्ट आहे असा निरोप त्यांनी दिला. पण, मी सुरुवातीला नकार दिला. मी वेब सीरिज पाहिल्या आहेत पण त्यात फक्त सेक्स आणि हिंसा असलेच सीन असतात त्यामुळे मला त्यात रस नाही असं म्हणत मी माझा नकार कळवला. मात्र, या सीरिजमध्ये असं काही नाही याची गॅरंटी मनोजने मला दिली", असं मनोज बाजपेयी म्हणाले.

पुढे तो म्हणतो, "मला असं कळलं होतं अक्षय खन्ना फॅमिली मॅन करतोय त्यामुळे मला कोणाकडून काम हिसकावून घ्यायचं नव्हतं. म्हणून, जर अक्षय खन्नाची माहिती जर खरी असेल तर मला स्क्रिप्ट आवडल्यानंतर सुद्धा मी त्यात काम करणार नाही, असं स्पष्ट सांगितलं. पण, असं काही नाहीये याची खात्री मला मुकेश छाबडाने दिली. त्यानंतर २० मिनिटांचं नरेशन झाल्यानंतर मी या सीरिजसाठी होकार दिला."

"या सीरिजसाठी मी होकार दिल्यानंतर माझी पत्नी शबाना हिने तर मला ती करुच नको असा सल्ला दिला होता. हे ओटीटी काय प्रकरण आहे? पैशांची एवढी काय गरज आहे? तुला तुझं करिअर उद्धवस्त करायचं आहे का? आता सगळं सुरळीत चाललं आहे ना मग तुला का सगळं संपवायचं आहे, असे कितीतरी प्रश्न विचारुन तिने मला ही सीरिज करुच नये असं सांगितलं होतं. '' दरम्यान, पत्नीच्या नकारानंतर मनोजने तिला सविस्तर या सीरिजविषयी समजावलं त्यानंतर तिने होकार दिला. 

टॅग्स :मनोज वाजपेयीवेबसीरिजसेलिब्रिटी