Join us
Daily Top 2Weekly Top 5

इतरांच्या चुकीची शिक्षा मी भोगतोय...! ‘कोरोना पॉझिटीव्ह’ मनोज वाजपेयी संतापला, सांगितले सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 12:56 IST

बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता मनोज वाजपेयी याला कोरोनाची लागण झालीये आणि सध्या तो घरीच क्वारंटाईन आहे.

ठळक मुद्देमनोज वाजपेयीआधी अलीकडे रणबीर कपूरला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हेही कोरोना पॉझिटीव्ह आढळले होते.

बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता मनोज वाजपेयी याला कोरोनाची लागण झालीये आणि सध्या तो घरीच क्वारंटाईन आहे. याचदरम्यान मनोज वाजपेयीच्या एका विधानाने खळबळ माजली आहे. होय, इतरांच्या चुकीची शिक्षा मी भोगतोय, असे त्याने म्हटले आहे.‘सायलेन्स- कॅन यू हिअर इट’ या सिनेमाच्या व्हर्च्युअल ट्रेलर लॉन्चिंग इव्हेंटमध्ये मनोज काहीसा संतापलेला दिसला.  

‘कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर मी स्वत:ला क्वारंटाईन केले आहे. इतर कोणी नियम पाळले नाहीत, निष्काळजीपणा दाखवला म्हणून मी कोरोनाचा शिकार झालो. कोव्हिड 19 चे सर्व नियम काटेकोरपणे पाळले गेले असते तर काहीही अडचण नव्हती. प्रॉडक्शन हाऊसने याची काळजी घ्यायला हवी. प्रत्येक व्यक्तिने प्रोटोकॉल फॉल केला पाहिजे, याबाबत दक्ष असले पाहिजे. कोरोनाचे नियम पाळू तेव्हाच आपण चित्रपट पूर्ण करू शकतो. सॅनिटायजर व मास्क आपल्या आयुष्याची गरज बनली आहे. यासोबतच आपल्याला काम करायचे आहे,’ असे मनोज म्हणाला. कृपया कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा अन्यथा त्याची शिक्षा तुमच्यासोबतच इतरांनाही भोगावी लागेल, असेही त्याने म्हटले.मनोज वाजपेयीआधी ‘डिस्पॅच’च्या दिग्दर्शकाला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे मनोज वाजपेयीची टेस्ट केली गेली आणि तो सुद्धा पॉझिटीव्ह आढळला होता.

मनोजच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, मनोज सध्या ‘डिस्पॅच्ड’ या सिनेमात बिझी आहे. त्याचा हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार आहे. मनोजच्या‘द फॅमिली मॅन’ या वेबसीरिजचा दुसरा सीझनही लवकरच प्रेक्षकांचा भेटीस येणार आहे. हा दुसरा सीझन आधी 12 फेबु्रवारीला रिलीज होणार होता. मात्र ‘तांडव’ या वेबसीरिजवरील वादानंतर ‘द फॅमिली मॅन 2’ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.  ‘सायलन्स- कॅन यू हिअर इट’ या सिनेमातही मनोज दिसणार आहे. त्याचा हा सिनेमाही ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.मनोज वाजपेयीआधी अलीकडे रणबीर कपूरला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हेही कोरोना पॉझिटीव्ह आढळले होते.

टॅग्स :मनोज वाजपेयी