मुंबई : मानखुर्द मेट्रो क्रेन अपघातामुळे कोंडीत अडकलेले चालकां बरोबर अनेकांचे कुटुंब यात अडकल्याने त्यांनी वाहतूक पोलिसांच्या एक्स हॅन्डलवरून त्यांच्यावर निशाणा साधत राग व्यक्त केला.
''अहो माझी पत्नी अन मुलं साडे तीन तास कोंडीत मानखुर्दवरून येणे आणि परतणे कठीण झाले आहे. माझी पत्नी आणि मुले साडे तीन तास कोंडीत अडकले आहे. महामार्गावरील ३-४ तासांच्या वाहतूक कोंडीबद्दल पाेलिसांना माहिती नसणे हे खूप आश्चर्यकारक आहे. - अरुण वेंकटेशवरण
बीकेसी सात वाजता सोडले. पण दोन तासांहून अधिक वेळ कोंडीत आहे. हेच मुंबई पोलिसांचे नियोजन का? - शशांक महाजन
माझा पाच वर्षाचा मुलगा चार तासापासून कोंडीत आहे. तो आजारी आहे. कृपया मानखुर्द मार्ग मोकळा करा. - राजाबस खान
गेल्या साडे सहा तासापासून ही कोंडी सुरु आहे. - नेहा अरोरा
माझी बहीण तीन तासापासून कोंडीत आहे. पण, कोणीही पोलीस नाही. ना कसली मदत. - आरएस
हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा...; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी देखील मानखुर्द मार्गे पुणेला जात असताना या कोंडीत पाच तास अडकल्याबाबत खंत व्यक्त केली. त्यांनी इंस्टावर रात्री अकरा वाजता याबाबतचा व्हिडीओ शेअर केला. सोनाली यांनी सांगितले, गेल्या पाच तासापासून मानखुर्दमध्ये अडकले आहे. पोलिसांना विचारताच त्यांनी सांगितले की ही कोंडी वाईट असून पेशन्स ठेवा. तसेच कोंडी कधी संपेल याबाबत सांगता येणार नाही.
वाहतूक ऐरोलीमार्गे, तरी जैसे थे बुधवारी (दि. २९) रात्रीपर्यंत सायन-पनवेल मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली. मुंबईतून नवी मुंबईकडे येणारी वाहतूक ऐरोलीमार्गे वळवली गेल्याने फ्रि वेवरदेखील वाहतूक वाढून तिथेही कोंडी झाली. नवी मुंबईकरांना अवघ्या अर्ध्या तासाच्या प्रवासासाठी ऐरोलीमार्गे वळसा घालून सुमारे दोन ते अडीच तासांत नवी मुंबईत प्रवेश मिळाला.
Web Summary : Manhurd's traffic jam stranded commuters for hours due to a metro crane accident. Frustrated citizens, including actress Sonali Kulkarni, took to social media to express their distress and call for assistance, reporting delays up to six hours.
Web Summary : मानखुर्द में मेट्रो क्रेन दुर्घटना के कारण कई यात्री घंटों तक ट्रैफिक जाम में फंसे रहे। अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सहित कई परेशान नागरिकों ने सोशल मीडिया पर अपनी परेशानी व्यक्त की और मदद के लिए गुहार लगाई। छह घंटे तक की देरी की सूचना मिली।