Join us

इफ्फीमध्ये पार पडले मंजिरी फडणीसच्या 'मेघा'ज डिव्होर्स' फिल्मचे प्रिमियर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 16:39 IST

गेल्या महिन्यात रोममधल्या इटलीमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातदेखील याचा वर्ल्ड प्रिमियर झाला.

'बरोट हाऊस' चित्रपटाच्या यशानंतर मंजिरी फडणीस पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाली आहे.  मंजिरी फडणीस 'मेघा'ज डीव्होर्स' ह्या शॉर्ट फिल्म दिसणार आहे. या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शन अॅवॉर्ड विजेते दिग्दर्शक निला माधब पांडा ह्यांनी केले आहे. 'मेघा'ज डिव्होर्स ही एक शॉर्ट फिल्म आहे.  जगभरातील विविध घटस्फोटांचा अभ्यास करुन ही शॉर्ट फिल्म बनवण्यात आली आहे. नुकत्याच गोव्यात झालेल्या इफ्फी या ( आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव) महोत्सवात याचा प्रिमियर पार पडला. तसेच गेल्या महिन्यात रोममधल्या इटलीमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातदेखील याचा वर्ल्ड प्रिमियर झाला.

या शॉर्टफिल्मच्या माध्यमातून मंजिरी फडणीस अभिनेत्री दिव्या दत्तासोबत स्क्रिन शेअर करत आहे. 'मेघा'ज डीव्होर्स'  ही 11 मिनिटांची हिंदीतली शॉर्ट फिल्म लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही शॉर्ट फिल्म 11 चित्रपटांच्या संकलनाचा एक भाग आहे जो इंग्रजीमध्ये 1 तास 40 मिनिटांचा वैशिष्ट्यपूर्ण सादर करण्यात आला आहे. या शॉर्ट फिल्मची निर्मिती भारतात हॅन्डीमॅन अंतर्गत करण्यात आली आहे. त्याचसोबत मोरक्को, चाड, आयलँड, पोर्तुगल, स्वित्झर्लंड, आफगाणिस्तान, ब्राझील, चीन, न्युझिलँड आणि इटली या देशांचादेखील यात सहभाग आहे.

 ह्या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री मंजिरी म्हणाली की " सध्याच्या  परिस्थितीवर आधारित हा सिनेमा आहे त्यामुळे या सिनेमाचा भाग होणं ही माझ्यासाठी अभिनेत्री म्हणून एक सन्माची बाब आहे. नुकत्याच दिल्लीत झालेल्या प्रदूषण  वाढीमुळे हवेची गुणवत्ता खालावली होती. ही गोष्ट मनाला चटका लावून गेला. या शॉर्ट फिल्माच्या माध्यमातून मला याविषयाची जगजागृकता निर्माण करण्याची संधी मिळते आहे याचा मला आनंद आहे. नीलासारख्या प्रतिभावान दिग्दर्शकाबरोबर काम करताना मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. एक कलाकार म्हणून मेघा सारख्या प्रखर भूमिकेने मला खरोखरच परिपूर्ण केले.

ही गोष्ट मेघा आणि आकाशची आहे ज्यांचे लग्न हवा प्रदुषणामुळे धोक्यात आलेल्या जोडप्यांपैकी एक आहे. “दिल्लीत राहणाऱ्या मेघाच्या घटस्फोटाचे उद्दीष्ट एक सुंदर कथेच्या माध्यमातून पर्यावरण आणि हवामान बदलाविषयी जनजागृती निर्माण करणे आहे. या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून हवेमुळे होत असलेल्या प्रदुषणाचा दुष्परिणाम रोजच्या आयुष्यावर अर्थव्यवस्थेवर, मानवी भावनांवर आणि अगदी संबंधांवरही होतो असे मार्मिक भाष्य यातून केले आहे. हवामानातील बदल" आणि "वायू प्रदूषण" हे  शब्द फक्त शास्त्रज्ञ किंवा पर्यावरणशास्त्रज्ञासाठी मर्यादीत होते मात्र आता ते  सर्वसामान्यांमधील प्रत्येक आयुष्याचा एक भाग बनले आहेत.

टॅग्स :मंजिरी फडणीस