Join us

मनीषा राणीला काय झालं? हॉस्पिटलमधून व्हिडीओ शेअर करत दिलं हेल्थ अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 08:39 IST

मनीषानं  व्हिडीओ शेअर करत स्वत: तब्येतीचं अपडेट चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. 

आता अलीकडेच  'बिग बॉस' फेम मनीषा रानीचा एक फोटो समोर आला. ज्यामध्ये ती हॉस्पिटलच्या बेडवर पडली आहे. तिला अशा अवस्थेत पाहून तिचे चाहते हैराण झाले. तब्येत बिघडल्याने मनीषा रानी हिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मनीषाचे असे रुग्णालयातील फोटो पाहून तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे आणि त्यांना मनीषाला काय झाले हे जाणून घ्यायचे आहे. तर मनीषानं व्हिडीओ शेअर करत स्वत: तब्येतीचं अपडेट चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. 

फूड पॉयझनिंगचा त्रास होऊ लागल्याने मनीषा रानीची तब्येत खूपच बिघडली होती. त्यामुळे उपचारांसाठी तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं तिनं सांगितलं. ती म्हणाली, 'सध्या मी ठीक आहे. मला अन्नातून विषबाधा झाली होती. मला उलट्या, जुलाब आणि इतरही अनेक समस्या निर्माण झाल्या. पण मी आता ठीक आहे. काळजी करू नका, मला माहित आहे की तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझंही तुमच्यावर प्रेम आहे'. तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी काळजी व्यक्त केली. तसेच चाहते तिच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत. 

सध्या डॉक्टरांनी तिला निगराणीखाली ठेवले आहे. तर मनीषा राणी ही कायमच चर्चेत असते. सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रीय आहे . तिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांना अपडेट देत असते. मनीषा राणीने 'बिग बॉस ओटीटी 2' या लोकप्रिय शोमधून चाहत्यांचं मनोरंजन केलं. ती 'बिग बॉस OTT 2' मध्ये टॉप 3 मध्ये पोहोचली होती. यानंतर ती अभिषेक मल्हानसोबत एका म्युझिक व्हिडीओमध्ये दिसली. तसेच मनीषाने बिग बॉस ओटीटी विजेता एल्विश यादवसोबत एक म्युझिक व्हिडीओ देखील केला. जो खूप हिट झाला होता. नुकतंच मनिषा 'झलक दिखला जा' या डान्स रिॲलिटी शोमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारबिग बॉसटेलिव्हिजनसोशल मीडिया