बॉलिवूडचं एक दशक गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मनिषा कोईराला(Manisha koirala). अभिनय आणि सौंदर्य यांच्या जोरावर मनिषाने ९० चा काळ गाजवला. आजही तिचे अनेक सिनेमा प्रेक्षक मोठ्या आवडीने पाहतात. मनिषाने तिच्या वयाची पन्नाशी पार केली आहे. परंतु, या वयातही तिने तिचा ग्लॅमरस अंदाज जपला आहे. त्यामुळेच नेटकऱ्यांमध्ये तिच्या नवनवीन लूकची कायम चर्चा होते. अलिकडेच तिने तिचा ग्रे हेअर लूकमधील लेटेस्ट फोटो पोस्ट केला आहे.
मनिषा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे तिच्याविषयीचे प्रत्येक अपडेट ती चाहत्यांसोबत शेअर करते. यात अलिकडेच तिने इन्स्टाग्रामवर तिच्या नव्या लूकचा फोटो पोस्ट केला आहे. यात तिचे केस पांढरे (ग्रे हेअर) झाल्यासं दिसून येत आहे. मात्र, या फोटोला तिने दिलेलं कॅप्शन सर्वाधिक चर्चेत आलं आहे.
''काही वेळ अशी असतो ज्यावेळी चमकून दिसण्यासाठी कोणत्याही खास कारणाची गरज लागत नाही. फक्त आपल्या आवडीचे दागिने आणि आनंदी मन इतकाच शृंगार पुरेसा असतो'', असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे.
दरम्यान, मनिषा यशस्वी अभिनेत्री असून आजही ती कलाविश्वात सक्रीय आहे. मध्यंतरी ती 'हिरामंडी'मध्ये झळकली होती. 'हिरामंडी'मध्ये तिने साकारलेल्या अभिनयाचं सर्व स्तरांमधून कौतुक झालं.
Web Summary : Manisha Koirala, a Bollywood icon, redefines beauty by embracing her natural grey hair. She shared a photo emphasizing that happiness and favorite jewelry are enough to shine.
Web Summary : बॉलीवुड आइकन मनीषा कोइराला ने अपने प्राकृतिक ग्रे बालों को अपनाकर सौंदर्य को फिर से परिभाषित किया। उन्होंने एक तस्वीर साझा की जिसमें उन्होंने बताया कि चमकने के लिए खुशी और पसंदीदा गहने ही काफी हैं।