Join us
Daily Top 2Weekly Top 5

धर्मेंद्र यांच्यासोबत मनीष पॉलचा जय वीरू मोमेंट, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 07:00 IST

धर्मेंद्र यांच्यासोबत मनीषने एन्जॉय केला जय वीरू मोमेंट

अभिनेता व सूत्रसंचालक मनीष पॉल सारेगमापा लिटिल चॅम्प्सच्या नव्या सीझनमध्ये मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. मनीषने नेहमीच आपल्या अचूक कॉमिक टायमिंग व होस्टिंगने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. आपल्या अचूक विनोदी अंदाजासाठी त्याला सुलतान ऑफ स्टेज असे संबोधले जात आहे.

सारेगामापाच्या आगामी भागात ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहिले होते.  यावेळी मनीषने धर्मेंद्र यांना सुपरहिट एव्हरग्रीन सिनेमा शोलेमधील ये दोस्ती हे गाणं रिक्रिएट करण्याची विनंती केली. त्यानंतर धर्मेंद्र तयार झाले आणि त्यांनी हे गाणं स्कूटरवर रिक्रिएट केले.

याबाबत मनीष म्हणाला की, मी धर्मेंद्र यांचा खूप मोठा चाहता आहे आणि मी त्यांना शोलेमधील ये दोस्ती हम नहीं तोडेंगे हे गाणं रिक्रिएट करण्याची विनंती केली आणि ते तयारही झाले. आम्ही दोघे तसेच स्कूटरवर बसलो धर्मेंद्र वीरू बनले आणि मी जय. या भागात आम्ही खूप धमालमस्ती केली, ज्यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन होईल.

टॅग्स :मनीष पॉलधमेंद्र