Join us
Daily Top 2Weekly Top 5

आपल्या मुलांसह क्वॉलिटी टाईम एन्जॉय करते मंदिरा बेदी, काही महिन्यांपूर्वीच दुस-यांदा बनली आई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2020 06:00 IST

मंदिराने 1999 मध्ये निर्माता राज कौशलसोबत लग्न केले. लग्नानंतर 12 वर्षांनी मंदिरा मुलं झालं. मंदिराने पुढे सांगितले की, माझ्या करारांनी मला प्रेग्नेंट होऊ दिसे नाही.

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री मंदिरा बेदीने काही दिवसांपूर्वी एक मुलगी दत्तक घेतली. तारा बेदी कौशल असं मुलीचं नावही ठेवलं. स्वतः मंदिराने मुलगी दत्तक घेतल्याची माहिती सोशल मीडियावर दिली होती. आता मंदिराने मुलगा आणि मुलीसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. ताराला घरी आणल्यानंतर घरातील वातावरणही अगदी आनंदमय झाले आहे. मुलीच्या येण्याचा आनंद मंदिराच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय. सोशल मीडियावर तारा सोबतचे अनेक फोटो ती चाहत्यांसह शेअर करत असते. 

मंदिरा आणि राज एक ९ वर्षांचा मुलगा आहे. मंदिराने फोटोसोबत पोस्टमध्ये लिहिले की, 'आमची लहान मुलगी तारा आमच्याकडे देवाच्या आशीर्वादासारखी आली आहे. ४ वर्षाची मुलगी जिचे डोळे ताऱ्यासारखे चमकतात. वीरने त्याच्या बहिणीचं प्रेमाने स्वागत केलं. तारा बेदी-कौशल २८ जुलै २०२० ला आमच्या परिवाराची सदस्य झाली' असल्याचे सांगत तिने आपला आनंद व्यक्त केला होता.

२८ जुलै २०२० ला या मुलीला दत्तक घेतलं होतं. पण फोटो आता सोशल मीडियावर शेअर केले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून मंदिरा बेदी आणि राज कौशल मुलीला दत्तक घेण्याची प्रोसेस करत होते. ती आता यावर्षी पूर्ण झाली.

मंदिराने 1999 मध्ये निर्माता राज कौशलसोबत लग्न केले. लग्नानंतर 12 वर्षांनी मंदिरा मुलं झालं. मंदिराने पुढे सांगितले की, माझ्या करारांनी मला प्रेग्नेंट होऊ दिसे नाही. मला भीती होती की जर मी प्रेग्नेंट राहिले तर माझं करिअर संपले. माझ्या पतीमुळे आमचा संसार यशस्वी होऊ शकला. मंदिरा प्रभासच्या 'साहो'मध्ये दिसली होती. यात तिने नेगेटीव्ह शेड् होती.

एका मुलाखतीत तिने आपल्या पर्सनल लाईफबाबत अनेक गोष्टींचा खुलासा केला होता. मंदिराने सांगितले होते की, करिअरमुळे जवळपास 12 वर्षे ती आई होण्यापासून दूर पळत राहिली. कारण मनोरंजन जगात महिलांचे करिअर जास्त मोठं नसतं. टिव्ही आणि सिनेमांमध्ये जास्त काम करणाऱ्या महिलांबाबत मला असुरक्षिततेची भावना मनात निर्माण झाली होती.

टॅग्स :मंदिरा बेदी