Join us
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या वयासोबत आणखीन बोल्ड होत चाललीय ही अभिनेत्री, युजर्सनं विचारला तिचा फिटनेस फंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 13:29 IST

बॉलिवूडची ही अभिनेत्री फिटनेसमुळे नेहमी असते चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी नेहमी फिटनेसमुळे चर्चेत असते. ४७ वर्षांची असलेली मंदिराचा हॉटनेस चकीत करणारा आहे. मंदिराचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तिच्या फोटोंना चाहते लाइक करत आहेत. इतकेच नाही तर त्या चाहते कमेंट करून तिचा फिटनेस फंडा विचारत आहेत. 

मंदिराच्या फोटोत तिने व्हाईट ऑफ शोल्डर शर्ट परिधान केला आहे. दुसऱ्या फोटोत काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या दोन्ही आऊटफिटमध्ये ती बोल्ड अंदाजात दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. 

मंदिरा बेदीच्या या फोटोंवर कुणी गॉर्जियस तर कोणी खरंच स्वतःला मेंटेन केलं असल्याच्या कमेंट केल्या आहेत.एका युजरने म्हटलं की, ओएमजी हिचे इतके तरूण असल्याचे रहस्य काय आहे.

मंदिरा बेदी सोशल मीडियावर खूप सक्रीय असून ती तिच्या वर्कआऊटचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. बऱ्याचदा मंदिरा सोशल मीडियावर ट्रोल होते. युजर्स तिला कधी अंटी बोलतात तर कधी म्हातारी. मिड डेला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीनं ट्रोलिंगबद्दल सांगितलं होतं की, लोकांचं ट्रोल करणं हरॅसमेंटसारखे वाटते. तरीदेखील ट्रोलर्सकडे कानाडोळा करत मंदिरा तिच्या वर्कआऊटचा व्हिडिओ शेअर करत असते.

मंदिराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर मंदिरा लवकरच बाहुबली फेम प्रभासचा आगामी चित्रपट साहोमध्ये निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. तिला या चित्रपटात काम करण्याची संधी कशी मिळाली, याबद्दल मंदिराने सांगितले की, तिचे छोटे केस असल्यामुळे तिला निगेटिव्ह भूमिकेसाठी विचारले जाते. त्यामुळेच साहोमधील खलनायकाची भूमिका देखील अशीच मिळाली.

या चित्रपटात मंदिरा बेदीसोबतच श्रद्धा कपूर, नील नितीन मुकेश मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

टॅग्स :मंदिरा बेदीप्रभास