Join us
Daily Top 2Weekly Top 5

मंदार देवस्थळींनी फुलपाखरूसाठी लढवली ही शक्कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 14:56 IST

मानस आणि वैदेहीचे हे ड्रीम सॉंग असून पेशव्यांच्या घरातील बाळाचे ज्याप्रमाणे राजेशाही पद्धतीने बारसे होत असे, हे गाणे त्यापद्धतीने शूट केले आहे

ठळक मुद्देफुलपाखरू मध्ये आणखी एक गाणे शूट केलं

दिग्दर्शक मंदार देवस्थळी हे नेहमीच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांची फुलपाखरू ही मालिका तरुणांमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. मानस आणि वैदेही हे तर आजच्या तरुणाईचे जीव की प्राण आहेतच मात्र आता त्यांचं होणार बाळ म्हणजे काय असेल याची कल्पना करूच शकता आणि या बाळाचं बारसं साध्या पद्धतीने करण्यात काय ती मजा?? त्यामुळेच मंदार देवस्थळींनी एक शक्कल लढवली. फुलपाखरू मध्ये आणखी एक गाणे शूट केलं. मानस आणि वैदेहीचे हे ड्रीम सॉंग असून पेशव्यांच्या घरातील बाळाचे ज्याप्रमाणे राजेशाही पद्धतीने बारसे होत असे, हे गाणे त्यापद्धतीने शूट केले आहे . यात मानस आणि वैदेहीचे संपूर्ण कुटुंब मराठमोळ्या पेशवाई पद्धतीच्या कपड्यांमध्ये असून मराठमोळ्या राजघराण्याच्या आभास निर्माण करण्यात आले आहे. 

हृता दुर्गुळे हिला याबद्दल विचारले असता तिने सांगितले, ' आपण मराठी आहोत त्यामुळे आपल्यातलं मराठीपण आपण जपलं पाहिजे. आपल्या परंपरा आपले आधीची लोक परिधान करत असलेले कपडे दागिने खूपच सुंदर होते. आज या ड्रीम सिक्वेन्स मुळे मलाही तो पेहराव करता आला याचा आनंद आहे. मुख्यतः मानस वैदेहीचे बाळ त्या कपड्यात खूप गोड दिसतेय."

नांदे सुखाची सावली, नाती अतूट ही बांधली ... गाण्याचे बोल असून गोड गळ्याची गायिका सावनी रवींद्र आणि यशोमान आपटे यांनी हे गाणे एकत्र गायले आहे. विशाल राणे हे या गाण्याचे संगीत दिग्दर्शक असून फुलपाखरू कुटुंबातील मुख्य शीर्षक गाणे पकडून हे १७ वे गाणे आहे...

टॅग्स :फुलपाखरूऋता दूर्गुळेझी मराठी