Join us

पैठणीमध्ये मानसी नाईकच्या सौंदर्याला लागले चारचाँद, फोटो पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 06:30 IST

मानसी नाईक हिने पैठणी साडीत फोटोशूट केले आहे.

मानसीनं आपली फॅशन स्टाईल जपली आहे. तसेच ती बऱ्याचदा तिच्या डान्स व फॅशन स्टेटमेंटमुळे चर्चेत असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून तिच्या रिलेशनशीप व बॉयफ्रेंडसोबतच्या फोटोमुळे चर्चेत येत असते. आता तिचा सोशल मीडियावर मराठमोळा अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे. तिने पैठणी साडीत फोटोशूट केले असून यात ती खूपच सुंदर दिसते आहे.

मानसी नाईक हिने पैठणी साडीत फोटोशूट केले असून तिने हा गेटअप फॅमिली फंक्शनसाठी केला होता. पैठणीमध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे.

वाढदिवसादिवशीच तिच्या रिलेशनशीपबद्दल सांगितलं होते. तिने प्रेमात असल्याचे सांगून तिच्या बॉयफ्रेंडचा फोटो शेअर केला. मानसी नाईक हिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्या दोघांचा फोटो शेअर करत लिहिले की, यावर्षी मी स्वतःला गिफ्ट द्यायचे ठरवले तेही प्रेम व कमिटमेंटसोबत. ओळखा काय असेल ते. मेहनती, प्रेमळ व विश्वासू आणि कमिटेड व्यक्ती. हो मी प्रेमात पडली आहे. प्रदीप खरेरा तुझे माझ्या जगात स्वागत आहे.

मानसी नाईक हिने प्रेक्षकांना आपल्या नृत्याच्या अदांनी घायाळ केले आहे. 'बघतोय रिक्षावाला' म्हणत तिने मराठी प्रेक्षकांना आपल्या तालावर डोलायला लावले.

ढोलकीच्या तालावर, हॅलो बोल, मराठी तारका यांसारख्या अनेक मराठी रिअ‍ॅॅॅॅलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून अभिनेत्री मानसी नाईकच्या रूपाने मराठी इंडस्ट्रीला एक चांगली नृत्यांगना मिळाली आहे.

त्याचबरोबर एकता - एक पॉवर, कुटुंब, तीन बायका फजिती ऐका, जबरदस्त, मर्डर मेस्त्री, ढोलकी, हू तू तू, कोकणस्थ यांसारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाचीदेखील ओळख तिने करून दिली आहे. 

टॅग्स :मानसी नाईक