Join us
Daily Top 2Weekly Top 5

गंगाने सांगितला धक्कादायक अनुभव, एकाने तिच्या समोरच उघडली होती पँटची चेन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 19:27 IST

गंगाने नुकतीच ही धक्कादायक गोष्ट सांगितली आहे.

ठळक मुद्देगंगाने सांगितले की, मी एकदा एका रेल्वे स्टेशनवर रात्री 11 वाजता शुटींग करत होते. त्यावेळी दिग्दर्शकाच्या मागे उभ्या असलेल्या एका व्यक्तीने अचानक पँटची झीप उघडली आणि तो अश्लील हातवारे करू लागला.

झी युवा वाहिनीवरील ‘युवा डान्सिंग क्वीन’ ही स्पर्धा सध्या स्पर्धकांच्या नृत्याविष्काराने गाजते आहे. युवा डान्सिंग क्विन या डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये सौंदर्यवतींचे एकापेक्षा एक डान्स परफॉर्मन्स पाहायला मिळतात. मात्र या शोमधील एक व्यक्ती सगळ्यांचे लक्ष वेधते, ती म्हणजे गंगा. तुम्हाला ठाऊक असेलच की, गंगा एक ट्रान्सजेंडर आहे. तिचे खरे नाव प्रणित हाटे. गंगा एक ट्रान्सजेंडर असून तिचे याआधीचे फोटो पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही की हाच प्रणित आता गंगा म्हणून समोर आला आहे. युवा डान्सिंग क्विनच्या मंचाने गंगाला सगळ्यांसमोर येण्याची संधी दिली आहे.

‘युवा डान्सिंग क्वीन’ मुळे गंगा आज घराघरात पोहोचली. पण तिचा इथपर्यंतचा प्रवास खचितच सोपा नव्हता. गंगाने नुकतीच टाईम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली असून या मुलाखतीत एक धक्कादायक गोष्ट सांगितली आहे.

या मुलाखतीत गंगाने सांगितले की, मी ट्रान्सजेंडर असल्याने मला अनेक वाईट अनुभवांचा सामना आजवर माझ्या आयुष्यात करावा लागला आहे. माझ्या आयुष्यात घडलेला एक प्रसंग तर मी कधीच विसरू शकत नाही. मी एकदा एका रेल्वे स्टेशनवर रात्री 11 वाजता शुटींग करत होते. त्यावेळी दिग्दर्शकाच्या मागे उभ्या असलेल्या एका व्यक्तीने अचानक पँटची झीप उघडली आणि तो अश्लील हातवारे करू लागला. त्या प्रसंगामुळे मी प्रचंड घाबरले. लोकांना अशाप्रकारे वागण्याचे धाडसच कसे येते हेच मला कळत नाही.

टॅग्स :झी युवा