Join us  

मल्लिका शेरावत सिनेमात करत नाही काम, मोठं कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2022 12:36 PM

Mallika Sherawat : एकेकाळी बॉलिवूडमधील सर्वात बोल्ड अभिनेत्रींमध्ये मल्लिका शेरावतचाही समावेश होता. आता मल्लिका शेरावत बऱ्याच मोठ्या कालावधीपासून सिनेइंडस्ट्रीपासून लांब आहे.

एकेकाळी बॉलिवूडमधील सर्वात बोल्ड अभिनेत्रींमध्ये मल्लिका शेरावत(Mallika Sherawat)चाही समावेश होता. आता मल्लिका शेरावत बऱ्याच मोठा कालावधीपासून सिनेइंडस्ट्रीपासून लांब आहे. मात्र, आता रजत कपूर यांच्या चित्रपटातून मल्लिका कमबॅक करते आहे. मल्लिका शेरावत चित्रपटात काम करत नाही, यामागचं कारण समोर आले आहे.

मल्लिका शेरावतनं बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मी तडजोड करायला तयार नसल्यामुळे माझ्या हातून काही चित्रपट गेले. अनेकदा तिच्या चांगल्या भूमिका हिरावून घेतल्या गेल्या, कारण तिने 'तडजोड' करायला नकार दिल्याचे तिने सांगितले. ती म्हणाली की, माझं खूप नुकसान झाले. हिरोला आपल्या गर्लफ्रेंडला त्याच्या चित्रपटात घ्यायचे असते. अनेक काम हातून निसटले, कारण मी हिरोसोबत तडजोड करायला नकार दिला. मला आठवते आहे की, माझ्याकडे ६५ स्क्रिप्ट पडल्या होत्या आणि त्यातील एकही काम मला मिळाले नाही, कारण हिरोचा आक्षेप होता.

'गुरू' चित्रपटातील भूमिका कट केल्याबद्दल मल्लिका म्हणाली की, या सिनेमात तिची भूमिका चांगल्या सहकलाकाराची होती. मात्र, ती भूमिका एडिट करण्यात आली आणि एक गाणेच चित्रपटात ठेवले गेले. २००७ साली आलेल्या अभिषेक बच्चनच्या 'गुरू' चित्रपटातील 'मैया मैया' गाणे खूप लोकप्रिय झाले होते. या गाण्यात मल्लिका शेरावत दिसली होती.

मल्लिका शेरावतने बॉलिवूडमध्ये जेवढे काम केले, त्यात ती समाधानी असल्याचे सांगते. मात्र, त्याचवेळी ती हाही दावा करते की, "मी कुठल्या प्रसिद्ध कुटुंबातून बॉलिवूडमध्ये आले नव्हते किंवा माझा कुणी गॉडफादर नव्हता. त्यामुळे या इंडस्ट्रीत टिकून राहणे चॅलेजिंग होते.

टॅग्स :मल्लिका शेरावत