Join us

Video : हाय हिल्स,त्यातच गेला तोल, फॅशनच्या नादात पडता पडता वाचली मलायका अरोरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 16:37 IST

मलायका अरोरासोबत (Malaika Arora) तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरही (Arjun kapoor) या पार्टीत पोहचला होता. मलायकाने फोटोग्राफर्सना फोटो काढण्यासाठी पोजवर पोज दिल्या. सगळ्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छाही दिल्या.

फॅशन आणि स्टाईलबाबत सेलिब्रिटी मंडळी फारच सजग असतात. त्यातच एखादी बड्या व्यक्तीची पार्टी किंवा मोठा इव्हेंट असेल तर सेलिब्रिटी आपल्या स्टाईलबाबत फारच चोखंदळ असल्याचे पाहायला मिळतेय.एखादा इव्हेंट, सोहळ्याला हजेरी लावताना सेलिब्रिटी मंडळी संपूर्ण तयारीत हजेरी लावतात. या प्रसंगी आपण ग्लॅमरस, हँडसम कसे दिसू आणि उपस्थितांच्या नजरांसह कॅमेऱ्याच्या नजरा आपल्याकडे कशा राहतील याची सेलिब्रिटी मंडळी विशेष काळजी घेतात. त्यामुळे महागडे डिझायनर ड्रेसेस किंवा स्टायलिश लूकमध्ये सेलिब्रिटी या कार्यक्रमांना हजेरी लावतात. मात्र कधी कधी याच स्टाईल आणि फॅशनमुळे सेलिब्रिटींवर कधी कधी अवघडल्यासारखी परिस्थिती येते असंच काहीसं घडलं आहे मलायका अरोरासोबत.

छैय्या छैय्या गर्ल मलायका अरोरा (Malaika Arora) आपल्या हटके स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. तसंही मलायकासाठी आपल्या फॅशन आणि महागड्या स्टाईल स्टेटमेंटमुळे प्रसिद्धीच्या झोतात येणं काही नवीन नाही. पुन्हा एकदा मलायका अरोरा चर्चेत आली आहे. यामुळे तिच्या स्टाईल स्टेटमेंटमुळे नाहीतर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. 

 

नुकतेच करिश्मा कपूरने ख्रिसमसनिमित्त तिच्या घरी डिनर पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत मलायका अरोराही पोहोचली होती. यावेली मालयकाने शिमर हिरव्या रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये मलायकाचं सौंदर्य आणखीनच खुलून गेल्याचं पाहायला मिळालं.साजेशी ज्वेलरी आणि न्यूड मेकअप तिने यावेळी केला होता. आकर्षक ड्रेससोबत हाय हिल्सही तिने घातले होते.

याच हाय हिल्समुळे मलायका पडता पडता वाचली. त्याचं झालं असं की, कारमधून उतरताच तिचा पायघसरला आणि त्यात तिला तोल गेला. तिच्या शेजारी उभ्या असलेल्या एका माणसाने तिला सावरल्याचे समोर आलेल्या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. यासंबंधीचे काही फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

मलायका अरोरासोबत तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरही (Arjun Kapoor) या पार्टीत पोहचला होता. मलायकाने फोटोग्राफर्सना फोटो काढण्यासाठी पोजवर पोज दिल्या. सगळ्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छाही दिल्या. या पार्टीत मलायकाच नाही तर करीना कपूरही पती सैफ अली खान आणि मुलगा तैमूर अली खानसोबत पोहोचली होती. त्याचवेळी अमृता अरोराही तिच्या पतीसोबत स्टायलिश अंदाज हजर होती.

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूर