Join us
Daily Top 2Weekly Top 5

ग्लोइंग स्किनसाठी टीप्स देण्याआधी....मलायका अरोरा झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 14:54 IST

47 वर्षांच्या वयातही स्वत:ला खूप चांगले फिट ठेवले आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा बिकिनी अवतार तिने शेअर केला होता तिचा हा बोल्ड अंदाज चाहत्यांना कमालीचा आवडला असून काहीच तासांत या फोटोंना हजारो लाईक्स मिळाले होते.

छैय्या छैय्या गर्ल मलायका अरोरा नेहमीच तिच्या वर्कआऊट व्हिडीओ आणि फोटोमुळे इतरांना प्रेरणा देत असते. ती  फिटनेस फ्रिक आहे हे जगजाहीर आहे.  मलायका ही चोखदंड आहे.ती जे काही करते त्यात काही ना काही खासियत असतेच. तिचा व्हायरल झालेल्या फोटोत याची प्रचिती येईल. तिचा एक नवीन फोटो समोर आला आहे. यात ती ग्लोइंग स्कीनसाठी टीप्स देताना दिसत आहे.मात्र मलायकाने शेअर केलेला फोटो फिल्टर लावलेले आहे. त्यामुळे चाहत्यांनी देखील तिची खिल्ली उडवायचा सुरुवात केली. ग्लोइंग स्किन दाखवण्याआधी फोटोचा फिल्टर तरी काढ अशा आशयाच्या कमेंट्स तिच्या या फोटोवर येत आहे. प्रमाणाबाहेर फोटोत तिची स्किन ग्लो होत असल्याचे दिसतंय. त्यामुळे सध्या या फोटोंमुळेच मलायका पुन्हा एकदा ट्रोल होत आहे. 

वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही मलायकाचे फिटनेस प्रेम पाहून भल्या भल्यांची बोलती बंद नाही झाली तरच नवल. तिचे वर्कआऊट करतानाचे व्हिडीओ  खूप व्हायरल होत असतात यावर खूप सारे कमेंटस आणि लाईक्सचा वर्षाव होत असतो. 47 वर्षांच्या वयातही स्वत:ला खूप चांगले फिट ठेवले आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा बिकिनी अवतार तिने शेअर केला होता तिचा हा बोल्ड अंदाज चाहत्यांना कमालीचा आवडला असून काहीच तासांत या फोटोंना हजारो लाईक्स मिळाले होते. 

मलायकाला देखील कोरोनाची लागण झाली होती. कोरोनामुळे तिचे वनजही वाढले होते. वाढलेले वजन कमी करण्यासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली. कोरोनाकाळातला अनुभव देखील मलायकाने सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केला आहे. पोस्ट शेअर करत तिने लिहीले की, दोन पावले चालणेदेखील कोणत्या टास्कपेक्षा कमी नव्हते.

 

फक्त अंथरुणातून उठून बसणे आणि खिडकीत उभे पाहणे हा एक प्रवास होता. माझे वजन वाढले, मला अशक्त वाटत होते माझी सहनशक्ती संपली होती. मी कुटुंबापासून दुरावली होती आणि बरेच काही घडले. त्याचदरम्यान जमेल तसे वर्कआऊट करत गेले आणि शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या पुन्हा एकदा पुर्वीसारखेच फिट वाटत असल्याचे तिने सांगितले.

टॅग्स :मलायका अरोरा