Join us
Daily Top 2Weekly Top 5

गुलाबी थंडीत प्रेम फुलतंय! मलायकाने शेअर केला खास फोटो; अर्जुनच्या मिठीत सामावून, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2020 09:02 IST

आता मलायकाने तिचा अर्जुन कपूरसोबतचा एक खास फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून दोघेही प्रेमात किती हरवले आहेत हेच दिसतंय.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर भलेही आपल्या रिलेशनशिपबाबत काही बोलत नसतील. पण त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून दोघांमधील सगळं काही कळतं. थॅंक्सगिविंग २०२० च्या निमित्ताने मलायकाने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यात तिच्या आयुष्यातील खास लोक होते. या व्हिडीओत अर्जुन कपूरही अनेक ठिकाणी दिसला. आता मलायकाने तिचा अर्जुन कपूरसोबतचा एक खास फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून दोघेही प्रेमात किती हरवले आहेत हेच दिसतंय.

मलायका अरोराने रविवारी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केलाय. या फोटोत अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा एकमेकांच्या मिठीत दिसत आहेत. दोघेही हसत आहेत. या फोटोला मलायका छान असं कॅप्शनही दिलं आहे. तिने लिहिले की, 'जेव्हा तू सोबत असतो तेव्हा एकही क्षण निराश करणारा नसतो'.

अर्जुन आणि मलायकाची सोबत दिवाळी

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी काही दिवसांपूर्वी धर्मशाला येथे सोबत वेळ घालवला. यावेळी अर्जुन कपूर सैफ अली खान, यामी गौतम आणि जॅकलिन फर्नाडिससोबत हिमाचल प्रदेशात 'भूत पोलीस' चं शूटींग करत होता. दिवाळीला मलायका त्याच्याजवळ गेली होती. मलायका मुंबईला परत आली आणि आता असं वाटतंय की, तिला त्याची आठवण येतीये.

अर्जुनची खास पोस्ट

अर्जुन कपूरने नुकताच इन्स्टाग्रामवर त्याचा एक फोटो शेअर केला होता. पण या फोटोपेक्षा त्याच्या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. त्याने लिहिलं होतं की, 'जेव्हा ती तुमच्याकडे बघते'. यावर मलायकाने कमेंट केली की कोण?. यावर अर्जुनने उत्तर दिलं, 'जरा अंदाज लाव मूर्ख'. 

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूरबॉलिवूड