Join us
Daily Top 2Weekly Top 5

ओव्हर साईज शर्ट घालून मलायका अरोराने केले स्टायलिश फोटोशूट, फोटो क्षणात झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 11:17 IST

मलायकाने सोशल अकाऊंटवर स्वत:चे काही हॉट फोटो शेअर केले आहेत आणि या हॉट फोटोंनी इंटरनेटवर नुसता धुमाकूळ घातला आहे.

ठळक मुद्दे मलायकाच्या या युनिक शर्टबद्दल सांगायचे तर याची किंमत 6500 रूपये आहे.

बॉलिवूडची ‘मुन्नी’ अर्थात मलायका अरोरा तिचे पर्सनल लाईफ व हॉट फोटोंमुळे सतत चर्चेत असते. सोशल मीडियावर रोज नवे हॉट, ग्लॅमरस फोटो शेअर करणे मलायकाचा आवडता उद्योग. आताही मलायकाने सोशल अकाऊंटवर स्वत:चे काही हॉट फोटो शेअर केले आहेत आणि या हॉट फोटोंनी इंटरनेटवर नुसता धुमाकूळ घातला आहे.

या फोटोंमध्ये मलायका ओव्हर साइज शर्टमध्ये दिसतेय. पांढरा शर्ट, पायात पांढरे बुट्स आणि मोकळे केस असा तिचा अवतार आहे. शर्टचे म्हणाल तर त्यावर लेखक व कवी चार्ल्स बुकोस्कीचे पोट्रेट दिसतेस. आपल्या या लूकसोबत मलायकाने ब्राइट आॅरेन्ज बॅग कॅरी करत  ग्लॅमरस पोज दिल्या आहेत.

मलायकाने या पोजमधले तीन फोटो शेअर केलेत. सोबत हे फोटो क्लिक करणाºया व्यक्तिचे नावही सांगितले आहे. आता मलायकाचे इतके जबरदस्त फोटो कोण क्लिक करेल? तर अनेकांच्या तोंडी अर्जुन कपूरचे नाव येईल. पण नाही मलायकाचे हे फोटो अर्जुनने नाही तर तिची बहीण अमृता अरोराने क्लिक केले आहेत.

मलायकाचे हे फोटो अमृता अरोराच्या वाढदिवसाचे आहेत. नुकताच अमृताचा वाढदिवस झाला. मलायका व तिची गर्ल गँग या पार्टीत धम्माल मस्ती करताना दिसले होते. यात करिना कपूर, करिश्मा कपूर या दोघी बहिणींचाही समावेश होता.

आता मलायकाच्या या युनिक शर्टबद्दल सांगायचे तर याची किंमत 6500 रूपये आहे. मलायका अरोरा नवीन वषार्चे सेलिब्रेशन करण्यासाठी गोव्याला गेली होती. तेव्हाही तिचे गोवा व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर असेच व्हायरल झाले होते. बिकनीतील तिच्या हॉट फोटोंना चाहत्यांची जबरदस्त पसंती मिळाली होती.  

टॅग्स :मलायका अरोरा