Join us

स्विमिंग पूलमध्ये योगा करताना दिसली मलायका अरोरा, फोटोची होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2021 16:18 IST

मलायका अरोरा आपल्या फिटनेसच्या बाबतीत खूप जागरूक आहे.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत येत आहे. सध्या ती बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत गोव्यात सुट्टी एन्जॉय करते आहे.तिने गोव्यातच यंदा न्यू इअर साजरा केला. मलायका सोशल मीडियावर एक्टिव्ह आहे आणि ती प्रत्येक अपडेट आपल्या चाहत्यांना देत असते. नुकताच तिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती योगा करताना दिसते आहे. तिने फोटो शेअर करत त्या योगा प्रकाराबद्दल सांगत त्याचे फायदेही सांगितले आहेत.

मलायका अरोराने फोटो शेअर करत तिने केलेल्या योगाचे नाव उत्थिता हस्ता पादांगुष्ठासन असल्याचे सांगितले आहे. या फोटोत ती स्विमिंग पूलमध्ये योगा करताना दिसते आहे. तिने हा फोटो शेअर करत लिहिले की, चला नवीन वर्षात वर्कआउट आणि योगा रुटीनने सुरूवात करत एका नवीन आठवड्याला सुरूवात करा.

मलायका अरोरा आपल्या फिटनेसच्या बाबतीत खूप जागरूक आहे. ती नेहमी सोशल मीडियावर योगा आसन किंवा फिटनेस टिप सांगताना दिसते. तिचे फिटनेस टिप्स चाहते फॉलोदेखील करतात. तिच्या या पोस्टला खूप लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. नुकतेच मलायकाने काही आणखी फोटो शेअर केले होते जे स्विमिंग पूलचे होते. या फोटोंमध्ये तिने बिकनी परिधान केली होती.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर त्यांच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत असतात. ते दोघे बऱ्याचदा एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर फोटो शेअर करत असतात.

नुकतेच त्यांचा एक फोटो समोर आला होता ज्यात ते दोघे गोव्यात न्यू इअर पार्टी करताना करताना दिसले होते.

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूर