Join us  

'आई, तू लग्न कधी करणार?', मुलानेच मलायकाला विचारला प्रश्न; मायलेकाच्या संभाषणावर होतेय टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 9:21 AM

मलायकाच्या 'त्या' प्रश्नावर नेटकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी

मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अरबाज खान (Arbaaz Khan) यांचा मुलगा अरहान खानचा (Arhaan Khan) 'डंब बिर्यानी' पॉडकास्ट सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी यामध्ये अरहानसोबत त्याचे मित्र होते. त्यांनी मिळून अरबाज आणि सोहेल खानशी गप्पा मारल्या होत्या. तर आता पॉडकास्टच्या पुढील भागात अरहानने त्याची आई मलायका अरोराचीमुलाखत घेतली आहे. मायलेकांमध्ये झालेल्या एका संवादामुळे त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

२१ वर्षीय अरहान खानने आईची घेतलेली मुलाखत व्हायरल होत आहे. सध्याचा या एक प्रोमो इन्स्टाग्रामवर अपोलड करण्यात आला आहे. यामध्ये मलायका अरहानला विचारते की 'तू पहिल्यांदा कधी तुझी व्हर्जिनिटी गमावली?' तर दुसरीकडे अरहान तिला विचारतो, 'आई, तू लग्न कधी करणार आहेस?' दोघांचे हे प्रश्न या पॉडकास्टमधील हायलाईट असणार आहेत. पॉडकास्टचा हा टीझर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

आईने मुलाला सर्वांसमोर असा प्रश्न विचारणं हे नेटकऱ्यांना काही पसंतीस पडलेलं नाही. 'मुलाला कोणी असं विचारतं का?' अशा कमेंट लोकांनी केल्या आहेत. तर काही नेटकरी या पॉडकास्टसाठी खूपच उत्साहित आहेत. लग्नाच्या प्रश्नावर मलायका काय उत्तर देते याची उत्सुकता नेटकऱ्यांना लागली आहे. आज रात्री 8 वाजता हा शो रिलीज होणार आहे.

टॅग्स :मलायका अरोरापरिवारमुलाखतसोशल मीडियाट्रोलबॉलिवूड