Join us

मलायका अरोरा पुन्हा प्रेमात? अर्जूनला सोडून मिस्ट्री मॅनबरोबर करतेय व्हॅकेशन एन्जॉय, फोटो समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 09:08 IST

मलायका अर्जुनशिवाय स्पेनमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. स्पेन व्हॅकेशनचे फोटो मलायकाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये एक मिस्ट्री मॅनही दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मलायका आणि अर्जुन कपूरचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच मलायका अर्जुनशिवाय स्पेनमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. स्पेन व्हॅकेशनचे फोटो मलायकाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये एक मिस्ट्री मॅनही दिसत आहे. त्यामुळेच मलायका पुन्हा प्रेमात पडली की काय, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. 

मलायकाने स्पेन व्हॅकेशनचे काही फोटो तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केले होते. या फोटोमध्ये एका मिस्ट्री मॅनला स्पॉट करण्यात आलं आहे. या स्टोरीमध्ये मलायकाने चार फोटोंचं कोलाज शेअर केलं आहे. यामध्ये मलायकाच्या सेल्फीबरोबर काही पदार्थांचे फोटो आहेत. यातीलच एका फोटोमध्ये मिस्ट्री मॅन दिसत आहेत. या मिस्ट्री मॅनचा चेहरा फोटोत स्पष्ट दिसत नाहीये. त्यामुळे तो नक्की कोण आहे, याबाबत चाहत्यांना प्रश्न पडला आहे. शिवाय या फोटोवर मलायकाने हार्ट इमोजी टाकल्याने ती पुन्हा प्रेमात पडल्याच्या आणि मिस्ट्री मॅनला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

गेल्या काही वर्षांपासून मलायका आणि अर्जुन कपूर एकमेकांना डेट करत होते.मलायका आणि अर्जुन लिव्ह इनमध्ये राहत असल्याचंही बोललं जात होतं. एकमेकांबरोबरचे फोटो पोस्ट करत ते प्रेम व्यक्त करतानाही दिसायचे. अनेक कार्यक्रमांना त्यांनी एकत्र हजेरीही लावली होती. पण, अनंत अंबानी राधिका मर्चंट यांच्या लग्नात मलायका कुठेच दिसली नाही. या शाही वेडिंग सोहळ्याला अर्जुन मात्र उपस्थित होता. त्यामुळेच त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या. 

मलायकाने १९९८ साली अरबाज खानशी लग्न करत संसार थाटला होता. परंतु, लग्नानंतर १९ वर्षांनी घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. त्यांना एक मुलगा आहे. अरबाजपासून घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अर्जुन कपूरबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. तर अरबाजने काही महिन्यांपूर्वीच मेकअप आर्टिस्ट शूरा खानशी निकाह करत नव्याने संसार थाटला आहे. 

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूरसेलिब्रिटी