Join us
Daily Top 2Weekly Top 5

मलायका झाली उप्स मोमेंटची शिकार, पाहा हा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 17:45 IST

मलायकाचे शॉर्ट्स खूपच छोटे असल्याने ती उप्स मुव्हमेंटची शिकार झाली. 

ठळक मुद्देमलायकाला अनेकवेळा मुंबईत तिच्या जिमच्या बाहेर पाहायला मिळते. नुकतेच मलायकाला जिमच्या बाहेर पाहाण्यात आले, त्यावेळी तिने टाईट टी शर्ट आणि शॉर्ट्स घातले होते. पण हे शॉर्ट्स खूपच छोटे असल्याने ती उप्स मुव्हमेंटची शिकार झाली. 

बऱ्याचदा पुरस्कार सोहळा किंवा लाईव्ह इव्हेंट्समध्ये बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंतचे सेलेब्स उप्स मोमेंटचे शिकार होताना पहायला मिळतात. सेलिब्रेटीज आपल्या बेस्ट आऊटफिटमध्ये इव्हेंट्सला येतात, पण बऱ्याचदा ड्रेस अनकम्फर्टेबल वाटत असल्यामुळे त्यांच्यासोबत घडलेल्या विचित्र गोष्टी घडताना पहायला मिळतात. अशा घटना बऱ्याचदा कॅमेऱ्यात कैद होतात आणि त्याचे व्हिडिओ व्हायरल होतात. याना गुप्ता पासून शिल्पा शेट्टी, आलिया भट, कियारा अडवाणी आणि दीपिका पादुकोण यांनादेखील उप्स मोमेंटला सामोरे जावे लागले आहे. या सेलिब्रेटींना त्यांच्या आऊटफिटमुळे पेचात सापडल्या आहेत. आता यात मलायका अरोराचादेखील समावेश झाला आहे.

मलायका तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. तिने वयाची चाळीशी ओलांडली असली ती फिटनेसच्याबाबतीत आजही विशीतील अभिनेत्रींना टक्कर देते. तिचे योगा करतानाचे, व्यायाम करतानाचे फोटो, व्हिडिओ ती सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असते. मलायकाला अनेकवेळा मुंबईत तिच्या जिमच्या बाहेर पाहायला मिळते. नुकतेच मलायकाला जिमच्या बाहेर पाहाण्यात आले, त्यावेळी तिने टाईट टी शर्ट आणि शॉर्ट्स घातले होते. पण हे शॉर्ट्स खूपच छोटे असल्याने ती उप्स मोमेंटची शिकार झाली. 

टिव्हीवर लवकरच 'इंडियाज बेस्ट डान्सर' हा कार्यक्रम सुरू होणार असून या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत मलायका अरोरा दिसणार आहे. याशिवाय कोरिओग्राफर गीता कपूर, टेरेंस लुईससुद्धा परीक्षकाची भूमिका बजावणार आहेत. या कार्यक्रमात 12 मेन्टॉर असणार असून ते आपल्या टीममधील स्पर्धकांना मार्गदर्शन करणार आहेत.

मलायका याआधी देखील 'इंडियाज गॉट टॅलेंट'ची जज होती. नज बलिये, जरा नचके दिया, झलक दिखला जा यांसारख्या अनेक रिअ‍ॅलिटी शो मध्ये तिने परीक्षकाची भूमिका बजावली आहे.

मलायका अरोरा सध्या तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या अर्जुन कपूरसोबत अफेअर असून त्या दोघांना अनेकवेळा एकत्र पाहायला मिळते. मलायका सध्या अर्जुन कपूरला डेट करतेय. यावरून मलायका अनेकदा ट्रोलही झाली. पण मलायकाने या ट्रोलिंगची कधीच पर्वा केली नाही. सध्या दोघांच्या लग्नाच्या चर्चा जोरात आहे. दीर्घकाळापासून मलायका अर्जुनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. लवकरच हे कपल लग्न करणार असे मानले जात आहे.

टॅग्स :मलायका अरोरा