Join us
Daily Top 2Weekly Top 5

बुड्ढी, डेस्पेरेट म्हणणाऱ्यांवर खूप भडकली होती मलायका अरोरा, सुनावले खडेबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 12:33 IST

बऱ्याचदा मलायका अरोराला म्हातारी, डेस्पेरेट आणि बऱ्याच वाईट कमेंट्सना सामोरे जावे लागते. कधी ती या ट्रोलर्सकडे कानाडोळा करते तर कधी चांगलेच सुनावते.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर नेहमी एकत्र स्पॉट होतात. दोघेही खुल्लमखुल्ला रोमांस करताना अजिबात कुणाची पर्वा करत नाहीत. त्यामुळे बऱ्याचदा त्यांना ट्रोल केले जाते. मलायका अर्जुनपेक्षा वयाने ११ वर्षे मोठी आहे ज्यामुळे ती वारंवार ट्रोल होते. बऱ्याचदा तिला म्हातारी, डेस्पेरेट आणि बऱ्याच वाईट कमेंट्सना सामोरे जावे लागते. कधी ती या ट्रोलर्सकडे कानाडोळा करते तर कधी चांगलेच सुनावते. 

हिंदुस्तान टाइम्सच्या एका जुन्या मुलाखतीत मलायका अरोराने सांगितले होते की, जेव्हा अरबाज सोबत ती विभक्त झाली तेव्हा तिला माहित नव्हते की ती कधी दुसऱ्या नात्यामध्ये जाईल. तिला पुन्हा मन तुटेल याची भीती होती. मात्र तिला नेहमीच एक प्रेमळ आणि नाते हवे होते आणि याच गोष्टीने तिच्यातील आत्मविश्वास वाढवला. तिने आणखी एका नात्याला आणि स्वतःला संधी दिली. या गोष्टीचा तिला आनंद आहे.

जेव्हा मलायका आणि अर्जुनच्या वयातील अंतरावर प्रश्न केले होते तेव्हा मलायका म्हणाली होती की, ही गोष्ट आम्हाला दोघांना अजिबात खटकत नाही. मात्र सोसायटी याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहते. दुर्भाग्याची गोष्ट आहे की आपण अशा समाजात राहतो आहे ज्याने काळानुसार बदलण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. वयाने मोठा असणारा पुरूष तरूण मुलीसोबत रोमांस करतो तेव्हा त्याची खूप प्रशंसा केली जाते. मात्र जेव्हा वयाने मोठी असणारी महिला असे करते तेव्हा तिला बुड्ढी, गोल्ड डिगर आणि डेस्पेरेट असे म्हटले जाते.

मलायका आणि अर्जुनच्या लग्नाचे वृत्त बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. मात्र अद्याप या बद्दल त्या दोघांकडून कोणातीच प्रतिक्रिया आली नाही. अर्जुनने म्हटले होते की, जेव्हा असे करणार असू तेव्हा सर्वात पहिला मीडियाला याची माहिती देऊ.

मलायकाने अर्जुनसोबतच्या रिलेशनशीपबद्दल २०१९मध्ये सांगितले होते. असेही सांगितले जाते की मलायका आणि अरबाज वेगळे होण्यामागे अर्जून कपूर कारणीभूत होता. तर काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले गेले आहे की, अरबाजच्या अफेयरमुळे मलायकाने हा निर्णय घेतला होता. मलायका अर्जुनसोबत नेहमी व्हॅकेशनला जात असते आणि त्यांचे फोटो बऱ्याचदा व्हायरल होतात.

टॅग्स :मलायका अरोराअरबाज खानअर्जुन कपूर