Join us

OMG अरबाज मलायकाच्या घटस्फोटानंतर मुलानेही दिली होती अशी प्रतिक्रिया,वाचून वाटेल आश्चर्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 16:56 IST

मलायका अरोराचे अरबाज खानसोबत (Arbaaz Khan) १९९८ मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर मुलगा अरहान खानचा जन्म झाला. मात्र लग्नाच्या 19 वर्षानंतर 2017 मध्ये, मलायका आणि अरबाज खानचा घटस्फोट झाला.

फिटनेस फ्रीक आणि अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Aroa) तिच्या अभिनयापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. मलायका सध्या अभिनेता अर्जुन कपूरसोबत (Arjun Kapoor) असलेल्या अफेअरमुळे प्रचंड चर्चेत असते.अर्जुन आणि मलायका त्यांच्या नात्याबद्दल अनेकदा जाहीरपणे कबुलीच देत असतात. दोघांचे नाते आता कोणापासून लपून राहिलेले नाही. 

मलायका अरोराचेअरबाज खानसोबत (Arbaaz Khan) १९९८ मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर मुलगा अरहान खानचा जन्म झाला. मात्र लग्नाच्या 19 वर्षानंतर 2017 मध्ये, मलायका आणि अरबाज खानचा घटस्फोट झाला. ज्याने जवळजवळ सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. मलायकाने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, “प्रत्येकाला जीवनात जोडीदार, नातं हवं असतं. त्यावेळी अरबाजसह काडीमोड घेऊ नये” असं अनेकांनी सुचवलं होतं असंही मलायकाने सांगितलं. मात्र काडीमोड घेण्याचा आपला निर्णय झाला होता आणि या निर्णयामुळे खूश आहे असंही तिने म्हटलं होतं. जे काही झालं चांगलंच झालं हे सांगायलाही ती विसरली नाही. 

सारं विसरून जीवनात पुढे जाताना ज्याच्यासोबत तुमचं चांगलं नातं निर्माण व्हावं असा एक चांगला मित्र आणि जोडीदार असावा, तसं झाल्यास तुम्ही नशीबवान असता. जीवनात आनंदी राहण्याची दुसरी संधी मिळाली असं समजावं असं सांगत मलायकाने अर्जुनसोबतच्या चांगल्या संबंधांची अप्रत्यक्ष कबुलीच दिली होती.तिच्या आणि अरबाजच्या घटस्फोटानंतर  मुलगा अरहानही खुश असल्याचे मलायकाने सांगितले होते. मलायकाने सांगितले होते की, 'मला माझ्या मुलाला आनंददायी वातावरणात बघायचे होते, तणाव आणि भांडण वातावरणात तो राहू नये असे सतत वाटायचे'. मलायकाच्या म्हणण्यानुसार, अरहानलासुद्धा समजले होते की आम्ही दोघे (मलायका आणि अरबाज) एकत्र राहण्यापेक्षा वेगळे राहणे चांगले. 

मलायकावर विश्वास ठेवला तर एकदा तिचा मुलगा घटस्फोटानंतर म्हणाला होता की, 'आई, तुला आनंदी आणि हसतमुख पाहून खूप आनंद झाला. अरहानची कस्टडी मलायकाकडे आहे.सध्या अरहान उच्च शिक्षणासाठी देशाबाहेर गेला आहे. त्याचवेळी अरबाज खानबद्दल बोलायचे झाले तर, तो सध्या इटालियन मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीला (Giorgia Andriani) ​डेट करत आहे

टॅग्स :मलायका अरोराअरबाज खान