Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘तू दु:ख व्यक्त करतेय की हसतेय?’; मंदिराच्या पतीच्या निधनावर महिमाची प्रतिक्रिया बघून भडकले युजर्स  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 13:45 IST

मंदिरा बेदीचा पती आणि निर्माता-दिग्दर्शक राज कौशल यांच्या निधनावर प्रतिक्रिया देताना महिमाची एक गोष्ट चाहत्यांना खटकली. यावरून महिमा सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होतेय.

ठळक मुद्दे बुधवारी पहाटे राज कौशल यांना हृदयविकाराचा झटका आला. रूग्णालयात नेत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली होती.

बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदीचा (Mandira bedi) पती आणि निर्माता-दिग्दर्शक राज कौशल (Raj Kaushal) यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. बुधवारी पहाटे राज यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अंत्यसंस्काराला बॉलिवूडचे अनेक दिग्गज हजर होते. अनेकांनी सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली. अभिनेत्री महिमा चौधरी (Mahima Chaudhry) ही सुद्धा राज यांना चांगलं ओळखत होती. मात्र राज यांच्या निधनावर प्रतिक्रिया देताना याच महिमाची एक गोष्ट चाहत्यांना खटकली. यावरून महिमा सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होतेय.

काल महिमा मुंबईत कुटुंबासोबत दिसली. यावेळी फोटोग्राफर्सनी तिला राज कौशल यांच्या अकाली निधनावर प्रतिक्रिया विचारली. यावर महिमा राज यांच्याबद्दल भरभरून बोलली. राज त्याच्या मोटर बाईकवर मला मुंबईत फिरवायचा. मी त्याला लहानपणापासून ओळखत होते, असे सांगत महिमाने राज यांचा तिच्या मोबाईलमध्ये असलेला बालपणीचा एक फोटोही दाखवला. महिमा हे सांगत असताना ती हसत असल्याचे काही चाहत्यांनी नोटीस केले आणि मग अनेकांनी महिमाला ट्रोल करायला सुरूवात केली.

‘लाज विकून खाल्ली का?, याला शोकसंवेदना व्यक्त करणे म्हणतात का? मृतात्म्याबद्दल बोलतानाही दात दाखवायची गरज आहे का?, अशा काय काय कमेंट्स लोकांनी लिहिल्या. तू इतकी असंवेदनशील कशी असू शकतेस? असे एका युजरने लिहिले.मंदिरा बेदी व राज कौशल यांना दोन मुलं आहेत. गेल्या वर्षीच दोघांनी एका मुलीला दत्तक घेतले होते. बुधवारी पहाटे राज कौशल यांना हृदयविकाराचा झटका आला. रूग्णालयात नेत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली होती.

टॅग्स :महिमा चौधरीमंदिरा बेदी