Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनयात येण्यापूर्वी महिमा चौधरी करायची हे काम, परदेस सिनेमातून मिळाली खरी ओळख

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 15:43 IST

शाहरुख खानसोबत 'परदेस' सिनेमातून तिला खरी ओळख मिळाली.तिचा हा पहिलाच सिनेमा होता.ती सगळ्यांत आधी  पेप्सीच्या जाहिरातीत आमिर खान आणि ऐश्वर्या रायसोबत दिसली होती.

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये महिमा चौधरीने केवळ तिच्या अभिनयानेच नाहीतर आपल्या मोहक सौंदर्यानेही रसिकांची भरघोस पसंती मिळवली आहे. शाहरुख खानसोबत 'परदेस' सिनेमातून तिला खरी ओळख मिळाली.तिचा हा पहिलाच सिनेमा होता.ती सगळ्यांत आधी  पेप्सीच्या जाहिरातीत आमिर खान आणि ऐश्वर्या रायसोबत दिसली होती. ती एका व्हीजे चॅनेलमध्ये काम करायची. या दरम्यान, दिग्दर्शक सुभाष घई यांची तिच्यावर नजर पडली आणि तिला परदेस सिनेमाची ऑफर दिली.

'परदेस' सिनेमासाठी, सुभाष घई तसेही अभिनेत्रीच्या शोधात होते.पण महिमाला पाहताच त्यांचा शोध संपला. महिमापूर्वी, या भूमिकेसाठी तब्बल 3000 ऑडिशन्स घेण्यात आल्या होत्या आणि त्यातून हवा तसा चेहरा मिळत नव्हता. महिमाला ही संधी देण्यात आली.तिने ही भूमिका चोख बजावली आणि तिला सर्वोत्कृष्ट पदार्पणासाठी फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.सर्वत्रच तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते.

यानंतर तिला चांगल्या चांगल्या सिनेमाच्या ऑफर्स मिळायला लागल्यात.'दाग', 'धड़कन', 'कुरुक्षेत्र', 'खिलाड़ी 420', 'साया', 'बागबान', 'एलओसी कारगिल' आणि 'गुमनाम' सिनेमात झळकत तिने इंडस्ट्रीत आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. तिच्या

 

फिल्मी करिअरप्रमाणे खासगी आयुष्यातल्या अफेअरमुळेही ती जास्त चर्चेत राहिली. लिअँडर पेससोबत तिच्या अफेअरच्या जोरदार चर्चा रंगल्या. पण त्यांचे  हे नाते फार काळ टिकू शकले नाही. महिमाने एका मुलाखतीत याविषयी बोलतना सांगितले होते की, रिलेशनशिपमध्ये राहिल्याने तिच्या करिअरवर परिणाम झाला.

यानंतर, बॉबी मुखर्जीची महिमा चौधरीच्या आयुष्यात एंट्री झाली आणि महिमा पुन्हा प्रेमात पडली. बॉबी मुखर्जी महिमाच्याच मित्राचा भाऊ होता. दोघांमध्ये ओळख झाली आणि त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.  बॉबी आणि महिमा यांनी 2006 मध्ये लग्न केले. पण हे लग्न फक्त 7 वर्षे टिकू शकले.

 

2013 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. बॉबी आणि महिमाला एक मुलगी आहे. अरिहाना असे मुलीचे नाव आहे .अरिहाना गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर सर्वांचीच आकर्षण ठरत असते. तिच्या क्यूटनेसच्या चर्चा सर्वत्र आहेत आणि ती हळूहळू लोकप्रिय स्टार किड्सच्या यादीतही सामील होत आहे.

 

टॅग्स :महिमा चौधरीलिएंडर पेस