Join us

..म्हणून सत्यानं हॉटेल सुरू केलं, महेश मांजरेकरांनी सांगितलं लेकाने व्यवसाय सुरु करण्यामागचं खरं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 14:44 IST

अभिनय क्षेत्रात नशीब आजमावत असातना त्याने अचानक हॉटेल का सुरु केलं याचा खुलासा महेश मांजरेकरांनी केला आहे.

मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेता म्हणजे महेश मांजरेकर. मराठीसह बॉलिवूडमध्येही महेश मांजरेकरांच्या नावाची चर्चा होत असते. महेश मांजरेकरांच्या लेकींनी सिनेविश्वात पदार्पण केलं असून त्यांचा लेकही कलाविश्वात नशीब आजमावत आहे. अलिकडेच सत्याने स्वत: व्यवसाय सुरु केला आहे. सत्याने ‘सुका सुखी’ (Suka Sukhi) हे नवीन मालवणी हॉटेल सुरु केलं आहे. सत्याने त्याच्या हॉटेलचे काही फोटो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले.

काही आठवड्यांपूर्वी या हॉटेलचं उद्घाटन करण्यात आलं आहे. अनेक मित्र मैत्रिणींनी सत्याला या नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या होच्या. आता खुद्द महेश मांजरेकरांनीही लेकाच्या या हॉटेल व्यवसायला त्यांच्या हटके पद्धतीनं शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच ‘सुका सुखी’चं खास वैशिष्ट्यही सांगितलं आहे. सुका सुखीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर महेश मांजरेकरांचा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडिओत त्यांनी हॉटेल सुरू करण्यामागचं कारणही सांगितलं आहे.

महेश मांजरेकर काय म्हणाले?आम्ही नवीन हॉटेल सुरु केलंय. इथं तुम्हाला अस्सल मालवणी पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. माझ्या घरात जे जेवण बनवलं जातं, ते लोकांना द्यायचं होतं. मी बऱ्याच ठिकाणी जातो, पण कमी ठिकाणी घरच्यासारखं जेवण मिळतं. मग विचार केला आपणच का सुरु करु नये..म्हणून आम्ही हे सुका सुखी हॉटेल सुरु केलं. इथं बनवले जाणारे सगळे पदार्थ मसाले असो किंवा तेल आमच्या घरचे असते.' असं महेश मांजरेकर या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसतायेत.  

टॅग्स :महेश मांजरेकर सेलिब्रिटी