Join us

'ओंक्या तू गद्दार आहेस...' नेटकऱ्याच्या कमेंटवर नम्रताने दिलं सडेतोड उत्तर; होतंय कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 14:16 IST

नम्रताने तिघांचा सेल्फी शेअर केला आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून सर्वांना हसवणाऱ्या ओंकार भोजनेने (Onkar Bhojane) अचानक कार्यक्रमातून एक्झिट घेतली. यामुळे अनेक चाहते निराश झाले. ओंकार नाही तर कार्यक्रमात मजाच नाही अशाही प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या. नुकतंच हास्यजत्रामधील सर्वांची लाडकी 'लॉली' म्हणजेच नम्रता संभेरावने (Namrata Sambherao) ओंकार भोजने आणि प्रसाद खांडेकरसोबत एक सेल्फी शेअर केला. यावर एका नेटकऱ्याने ओंकार गद्दार आहे अशी कमेंट केली. त्याला नम्रताने सडेतोड उत्तर दिले आहे.

नम्रताने तिघांचा सेल्फी शेअर करत लिहिले, 'कोणत्याच कॅप्शनची गरज नाही' यावर विशाल पवार या नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले, 'तू गद्दार आहेस ओंक्या, तू तुझ्या सर्व चाहत्यांसोबत गद्दारी केली आहेस यार. आम्ही सगळे तुला खूप मिस करतो. का सोडलीस हास्यजत्रा. निदान निमिष सारखं कधीतरी काही स्किट्ससाठी तरी यायचं ना. खूप आनंदी होऊ आम्ही सगळे तुला पुन्हा हास्यजत्रेत पाहून.'

नम्रताने या कमेंटवर प्रतिक्रिया देत लिहिले,'असं नाहीए, त्याला फक्त नव्या गोष्टी शिकायच्या होत्या, नवा मार्ग धरायचा होता. आपण त्याला पाठिंबा दिला पाहिजे.'

दरम्यान हास्यजत्रा शो सध्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांचा अत्यंत लोकप्रिय शो आहे. कार्यक्रमातील सर्वच कलाकार आज स्टार झालेत. पण तरी ओंकार भोजनेची चाहते आजही आतुरतेने वाट पाहत आहेत. वनिता खरातच्या लग्नातही ओंकारने हजेरी न लावल्याने त्यांच्यात काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र नंतर ओंकारने वनिताच्या घरी जाऊन तिची आणि नवऱ्याची भेट घेतली तेव्हा सर्वांच्याच जीवात जीव आला होता.

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्रानम्रता आवटे संभेरावसोशल मीडिया