Join us
Daily Top 2Weekly Top 5

याला म्हणतात संस्कार! कैलाश खेर समोर येताच गौरव मोरे पडला पाया, अभिनेत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 08:46 IST

गौरवचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत गौरव बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्या पाया पडताना दिसत आहे. 

गौरव मोरे हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय नट आहे. अनेक कॉमेडी शोमध्ये काम केलेल्या गौरवला महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोने लोकप्रियता मिळवून दिली. उत्कृष्ट अभिनय आणि विनोदाच अचूक टायमिंग साधत गौरव प्रेक्षकांना खळखळवून हसवतो. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या गौरवने टॅलेंट आणि मेहनतीच्या जोरावर सिनेसृष्टीत स्वत:चं स्थान निर्माण केलं. गौरवचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. सध्या गौरवचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत गौरव बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्या पाया पडताना दिसत आहे. 

नुकतंच रानटी या मराठी सिनेमाचा ग्रँड प्रिमियर सोहळा पार पडला. या ग्रँड प्रिमियरला मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांबरोबर बॉलिवूड सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. या सोहळ्याला गौरव मोरे उपस्थित होता. तर सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनीही या ग्रँड प्रिमियरला हजेरी लावली होती. या ग्रँड प्रिमियर सोहळ्यातील गौरव मोरे आणि कैलाश खेर यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत गौरव अभिनेता कैलाश वाघमारेशी बोलताना दिसत आहे. तेवढ्यात तिथे कैलाश खेर आणि रानटी सिनेमाचे दिग्दर्शक समित लक्कड येतात. त्यांना बघताच गौरव त्या दोघांच्याही पाया पडत असल्याचं दिसत आहे. 

गौरवच्या या व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला असून चाहत्यांकडून अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. दरम्यान, हास्यजत्रेबरोबरच गौरव हिंदी कॉमेडी शोमध्येही झळकला आहे. त्याने काही सिनेमांमध्येही काम केलं आहे. 

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकारकैलाश खेरमराठी अभिनेता