Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video : नाट्यसंमेलनातही गौरव मोरेची क्रेझ, फिल्टरपाड्याच्या बच्चनला चाहत्यांनी घेरलं, अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 14:17 IST

...अन् गौरव मोरेला चाहत्यांनी घेरलं, नाट्यसंमेलनातील फिल्टरपाड्याच्या बच्चनचा व्हिडिओ व्हायरल

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे गौरव मोरे. विनोदाचं अचूक टायमिंग साधत आणि हास्याचे फव्वारे उडवत फिल्टरपाड्याचा बच्चन प्रेक्षकांना खळखळून हसवतो. हास्यजत्रेतून प्रसिद्धीझोतात आलेल्या गौरवचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. तो सोशल मीडियावरुनही चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. नुकतंच गौरवने १००व्या अखिल मराठी नाट्यसंमेलनाला हजेरी लावली होती. 

नाट्यसंमेलनातही गौरवची क्रेझ पाहायला मिळाली. या संमेलनादरम्यान फिल्टरपाड्याच्या बच्चनला चाहत्यांनी घेरलं. गौरवने याचा व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओत गौरवला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केल्याचं दिसत आहे. गौरवबरोबर फोटो काढण्यासाठी आणि त्याची सही घेण्यासाठी त्याच्याभोवती चाहत्यांनी गराडा घातला आहे. चाहत्यांचं हे प्रेम बघून गौरव मोरेही थक्क झाला आहे. "धन्यवाद माय बाप रसिकहो खूप खूप प्रेम ...100 वे अखिल भारतीय नाट्य संमेलन," असं म्हणत त्याने व्हिडिओ शेअर केला आहे. त्याच्या या व्हिडिओवरही चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. 

दरम्यान, हास्यजत्रेमुळे लोकप्रियता मिळवलेल्या गौरवने अनेक कॉमेडी शोमध्ये काम केलं आहे. याबरोबरच अनेक मराठी चित्रपटांतही गौरव झळकला आहे. 'बॉइज ४'मध्ये गौरव दिसला होता. आता लवकरच नव्या सिनेमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्रामराठी अभिनेतामराठी नाट्य संमेलन