Join us

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम विशाखा सुभेदारने खरेदी केली नवी कार, म्हणते- "सगळ्यात पहिल्यांदा नॅनो घेतल्यानंतर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 15:36 IST

विशाखाने टाटा कंपनीची Nexon ही कार खरेदी केली आहे. याचा व्हिडिओ शेअर करत तिने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.

अभिनेत्री विशाखा सुभेदार हा मराठी कलाविश्वातील लाडका चेहरा आहे. अभिनयासोबत विनोदाने प्रेक्षकांना खळखळवून हसवणारी विशाखा प्रेक्षकांचीही लाडकी आहे. तिचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरुन चाहत्यांना नवीन प्रोजेक्ट आणि वैयक्तिक आयुष्यातले अपडेट्स देत असते. नुकतंच विशाखाने नवी कोरी गाडी घरी आणली आहे. 

विशाखाने टाटा कंपनीची Nexon ही कार खरेदी केली आहे. याचा व्हिडिओ शेअर करत तिने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. पतीसह विशाखा कार खरेदी करण्यासाठी गेली होती. "आमची नवीन family member. अगदी Nexon पाहावी अशी😉 नवी गाडी घेतल्याचा आनंद तर आहेच. विशेष म्हणजे यंदाही 'टाटा'चीच गाडी घेतली. सगळ्यात पहिल्यांदा नॅनो मग पुन्हा एक नॅनो, आणि आता ही दुसरी Nexon. माझ्या आधीच्या Nexon ला जुळी बहीण आली. माझं टाटाच वेडच म्हणा, पण येणाऱ्या प्रत्येक गाडीबरोबर प्रगती झाली. ती अशीच होत राहो..Nexon आधीची माझी सखी मी तुला खुप miss करेन असं मी म्हणणारच नाही. कारण तू तर माझ्यापाशी आहेसच. अंबरनाथ घरी...", असं विशाखाने व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे. 

विशाखाच्या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी तिचं अभिनंदन केलं आहे. दरम्यान, विशाखाने अनेक मालिका, नाटक आणि काही सिनेमांमध्येही काम केलं आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमुळे तिच्या चाहत्या वर्गात भर पडली. सध्या विशाखा 'शुभविवाह' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत ती खलनायिकेच्या भूमिकेत आहे. 

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकार