Join us

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' करणार प्रेक्षकांचा 31st डिसेंबर खास; सोनी मराठीवर दिवसभर मिळणार हास्याची मेजवानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 16:23 IST

Maharashtrachi hasyajatra: प्रेक्षकांचा वर्षाचा शेवट होणार खास

संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसायला लावणारा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराने त्यांच्या विनोद बुद्धीच्या जोरावर आणि अभिनयाच्या ताकदीमुळे प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचे रिपिट टेलिकास्टही प्रेक्षक तितक्याच आवडीने पाहतात.  विशेष म्हणजे ३१ डिसेंबरला हा कार्यक्रम प्रेक्षकांचं खास मनोरंजन करणार आहे.

येत्या ३१ डिसेंबरला सोनी मराठीवर संपूर्ण दिवसभर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचे वर्षभरातील प्रहसने दाखवली जाणार आहेत. तसंच रात्री ९ वाजता हास्याची नॉनस्टॉप पार्टी सुद्धा पाहायला मिळणार आहे.

या वर्षभरातील तणावपूर्ण जीवनशैलीतून काही घटका आनंद घेता यावा म्हणून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' वर्षअखेरीस संपूर्ण दिवस आपल्या भेटीस येणार आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या मालिकेच्या चाहत्यांसाठी ही गोष्ट आनंद द्विगुणित करणारी आणि औत्सुक्याची असणार आहे! 

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटेलिव्हिजनसेलिब्रिटीटिव्ही कलाकार