Join us
Daily Top 2Weekly Top 5

 माधुरी दीक्षित बनणार पॉप सिंगर! यावर्षी रिलीज होणार पहिला म्युझिक अल्बम!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 14:35 IST

आपल्या अदांनी, सौंदर्याने आणि नृत्याने घायाळ करणारी हीच माधुरी आता नवी इनिंग सुरु करणार आहे. होय, अभिनय आणि नृत्य यानंतर ती पॉप म्युझिकच्या क्षेत्रात पदार्पण करतेय.

ठळक मुद्देयेत्या १७ तारखेला माधुरीचा ‘कलंक’ हा सिनेमा प्रदर्शित होतोय. या चित्रपटात माधुरी व संजय दत्तची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करेल.

बॉलिवूडची ‘धक धक’ गर्ल माधुरी दीक्षित हिचे क्रेज अद्यापही कमी झालेले नाही. ‘अबोध’ या चित्रपटातून माधुरीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि पुढे सौंदर्य व सुंदर हास्याने रिझवणारी ही ‘धक धक’ गर्ल  चाहत्यांच्या मनात घर करून बसली. आपल्या अदांनी, सौंदर्याने आणि नृत्याने घायाळ करणारी हीच माधुरी आता नवी इनिंग सुरु करणार आहे. होय, अभिनय आणि नृत्य यानंतर ती पॉप म्युझिकच्या क्षेत्रात पदार्पण करतेय.

मिड डेच्या वृत्तानुसार, माधुरीच्या पहिल्या पॉप म्युझिक अल्बमची तयारी पूर्ण झाली आहे. याचवर्षात तिचा पहिलावहिला म्युझिक अल्बम रिलीज होणार आहे. माधुरीच्या आवाजातील गाण्यांचे रेकॉर्डिंग कधीच पूर्ण झालेय. पण चित्रपटांत बिझी असल्याने याचा व्हिडीओ अद्याप शूट झालेला नाही. तुम्हाला ठाऊक असेलच की, यापूर्वी ‘गुलाबी गँग’साठी माधुरीने गाणे गायले होते. या चित्रपटातील ‘रंगी सारी’ हे माधुरीच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आले होते. पण आता माधुरी पॉप सिंगीग करताना दिसणार आहे. या इंग्लिश अल्बमध्ये सहा गाणी असतील. आता माधुरीच्या या पॉप अल्बमला चाहते कसा प्रतिसाद देतात, ते बघूच.

येत्या १७ तारखेला माधुरीचा ‘कलंक’ हा सिनेमा प्रदर्शित होतोय. या चित्रपटात माधुरी व संजय दत्तची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करेल. ‘कलंक’मधील माधुरीवर चित्रीत ‘तबाह हो गए’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले. सध्या हे गाणे लोकांनी डोक्यावर घेतलेय. या चित्रपटात माधुरी बहार बेगमची भूमिका साकारताना दिसणार आहे.‘कलंक’आधी माधुरी ‘टोटल धमाल’मध्ये दिसली होती. या कॉमेडी सिनेमाने बॉक्सआॅफिसवर बक्कळ कमाई केली होती.

टॅग्स :माधुरी दिक्षितकलंक