Join us
Daily Top 2Weekly Top 5

माधुरीच्या सांगण्यावरुन संजय दत्तच्या बायोपिकमधून हटवला 'हा' सीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2018 14:50 IST

आता अशी माहिती समोर येतीये की, माधुरीने दिग्दर्शक राजकुमार हिरानीला फोन करुन सिनेमातून एक सीन डिलिट करवलाय. 

मुंबई : संजय दत्तचा बायोपिक 'संजू' मधून त्याच्या जीवनाशी अशा अनेक गोष्टी प्रेक्षकांना कळणार आहेत ज्या कुणाला माहीत नव्हत्या. त्याच्या ड्रग्सच्या सवयीपासून ते त्याच्या सर्वच अफेअर्सबाबत या सिनेमात दाखवण्यात आलं आहे. 90 च्या दशकात संजय दत्त आणि माधुरी दीक्षितच्या अफेअरच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. आता अशी माहिती समोर येतीये की, माधुरीने दिग्दर्शक राजकुमार हिरानीला फोन करुन सिनेमातून एक सीन डिलिट करवलाय. 

पिंकविलाने दिलेल्या एका वृत्तानुसार, सिनेमात एक सीन असा होता ज्यात संजयला अटक झाल्यानंतर त्याने एका अभिनेत्रीला फोन केला होता. पण फोन त्या अभिनेत्रीची आई उचलते. ती संजयला सांगते की, माझ्या मुलीला तुझ्यासोबत कोणतही नातं ठेवायचं नाहीये. असे म्हणतात की, अभिनेत्री दुसरी कुणी नसून माधुरी दीक्षित होती. 

संजय दत्तला जेव्हा 1993 मध्ये अटक झाली होती तेव्हा त्याने पोलिसांना एक फोन कॉल करण्याची परवानगी मागितली होती. संजयने हा फोन कॉल माधुरीला केला होता. पण त्यावेळी माधुरी संजयसोबतचं नातं तोडलं होतं. 

आधी माधुरीला या सीनबाबत माहीत नव्हतं. पण तिला याबाबत माहिती मिळताच तिने दिग्दर्शक राजकुमार हिराणी आणि संजय दत्तला फोन करुन हा सीन काढण्याची विनंती केली होती. त्यानुसार त्यांनी हा सीन सिनेमातून काढून टाकला. 

मीडिया रिपोर्टनुसार, सिनेमात माधुरी दीक्षितची भूमिका करिश्मा तन्ना साकारणार आहे. रणबीरसोबतच या सिनेमात सोमन कपूर, अनुष्का शर्मा, दिया मिर्झा, परेश रावल, विक्की कौशल, जिम सरभ यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. हा सिनेमा 29 जूनला रिलीज होणार आहे. 

टॅग्स :संजू चित्रपट 2018माधुरी दिक्षित