Join us
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाउनमध्ये ही मराठमोळी अभिनेत्री मारतेय स्वतःशीच गप्पा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 06:00 IST

सध्या खूप वेळ असल्यामुळे ही अभिनेत्री स्वतःशीच मारतेय गप्पा

प्रिया मराठे हिने छोट्या पडद्यावरील मालिकांमधून घराघरातील रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. लॉकडाउनमध्ये ती सध्या घरात कैद आहे आणि घरात असली तरीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात आहे. नुकताच तिने एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. 

प्रिया मराठे हिने इंस्टाग्रामवर मिरर सेल्फी काढला आहे आणि म्हटलं की, खूप वेळ मिळतोय सध्या "ती" च्याशी गप्पा मारायला.. काही गोष्टी नव्याने कळल्या तिच्या बद्दल.. तुम्ही मारताय की नाही स्वतःशीच गप्पा..

प्रिया मराठे हिने ‘या सुखांनो या’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर एंट्री मारली. यानंतर चार दिवस सासूचे या मालिकेत तिने काम केलं. तू तिथे मी या मालिकेत तिने साकारलेली निगेटिव्ह भूमिका विशेष गाजली. याशिवाय कसम से या मालिकेतून तिथे हिंदी मालिकांमध्ये एंट्री मारली. मात्र पवित्र रिश्ता मालिकेतील भूमिकेमुळे ती प्रत्येकाची लाडकी बनली.

बडे अच्छे लगते है, कॉमेडी सर्कसमध्येही प्रिया झळकली. तिने साथ निभाना साथिया या मालिकेतही एंट्री मारली. या मालिकेतही तिची निगेटिव्ह भूमिका होती. 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेतही तिने गोदावरी ही व्यक्तीरेखा साकारली. अशा विविध भूमिकेत प्रिया आपल्याला पाहायला मिळाली आहे.

 

टॅग्स :प्रिया मराठे