Join us

LMOTY 2025: कार्तिक आर्यनला 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार प्रदान, म्हणाला-"हा पुरस्कार मिळणं ही माझ्यासाठी.."

By तेजल गावडे. | Updated: March 19, 2025 20:49 IST

LMOTY Awards 2025 Kartik Aaryan:अभिनय क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी यंदाच्या 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' अवॉर्ड्सने कार्तिक आर्यनला सन्मानित करण्यात आले. हा सोहळा राजभवनात पार पडला.

LMOTY Awards 2025: अभिनेता कार्तिक आर्यन (Karthik Aryan)ने २०११ साली 'प्यार का पंचनामा' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने त्याच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक दमदार भूमिका केल्या आहेत. त्याने अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. अभिनय क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी यंदाच्या 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' अवॉर्ड्सने कार्तिक आर्यनला सन्मानित करण्यात आले. हा सोहळा राजभवनात पार पडला.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर कार्तिक आर्यन म्हणाला की, ''हा पुरस्कार मिळणं ही माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी गर्वाची बाब आहे. मी ग्वालियरचा आहे. माझी जन्मभूमी ग्वालियर आहे पण कर्मभूमी मुंबई आहे. मला जे यश मिळालंय ते इथेच मिळालं आहे. सर्वांचं प्रेम मिळालं आहे. मुंबई हा सिनेमाचा गड आहे. मुंबईत पोहोचणं माझं स्वप्न होतं. इथे येणं हा माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट होता. गीतेत लिहिल्याप्रमाणे फळाची चिंता मी करत नाही कर्म करत जातो. असा महाराष्ट्रीयन अवॉर्ड मिळणं हे जर फळ असेल तर मी चांगलं कर्म करतच राहीन."

वर्कफ्रंटमागील वर्षी कार्तिक आर्यनचे 'चंदू चॅम्पियन' आणि 'भूल भुलैया ३' असे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. हे दोन्ही चित्रपट यशस्वी झाले पण भूल भुलैया ३ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. कार्तिक आर्यनच्या आगामी चित्रपटाबद्दल सांगायचं तर तो 'आशिकी ३'मध्ये झळकणार आहे, जो यावर्षी दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दक्षिण अभिनेत्री श्रीलीला दिसणार आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' अवॉर्ड्स

महाराष्ट्रातील सर्वात मोठा अन् मानाचा पुरस्कार सोहळा म्हणजे 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' अवॉर्ड्स. लोकसेवा/समाजसेवा, कृषी, शिक्षण, क्रीडा, प्रशासन, वैद्यकीय, उद्योग, स्टार्ट अप या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना दरवर्षी या पुरस्कारानं गौरवण्यात येतं. 

टॅग्स :कार्तिक आर्यनलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2025लोकमत इव्हेंट