Join us

LMOTY 2019: मला 'या' खात्याची मंत्री व्हायला आवडेल; दीपिकानं सांगितली मन की बात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 16:53 IST

संधी मिळली तर स्वच्छ भारत मोहिमेसाठी मी काम करेन - दीपिका

मुंबई : संधी मिळली तर स्वच्छ भारत मोहिमेसाठी मी काम करेन. स्वच्छता करणे मला आवडते. लहानपणी मला माझे मित्र-मैत्रिणी घरी बोलावत होते. त्याची कपाटे मी आवरत होते. तेव्हा मला खूप छान वाटायचे. राजकारणात उतरल्यास स्वच्छ भारत अभियानाची मंत्री बनण्यास आवडेल अशी इच्छा अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने व्यक्त केली. अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेला लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार वितरण सोहळा वरळी येथील एनएससीआय डोममध्ये रंगला असून या सोहळ्याला दिग्गज मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे. उद्धव ठाकरे कसे वाटतात, या प्रश्नावर तिने खूप शांत वाटतात असे सावध उत्तर दिले. तसेच उद्धव यांनी घातलेले कपडे साधे आणि खादीचे आहेत. ते परिवारामध्ये गुंतलेले असतात. ही चांगली बाब आहे. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी मला नेहमी भेटतात. चांगली चर्चाही होते, असेही दीपिका म्हणाली. मुख्यमंत्र्यांबाबत विचारले असता तिने त्यांना व्यक्ती म्हणून ओळखते असे उत्तर दिले. व्यावसायिकदृषट्या माहीत नसल्याचे दीपिका पादूकोण यांनी सांगितले. तसेच लग्न मानवले का य प्रश्नावर हो असे उत्तर देत लग्न करा असे सर्वांना सुचवेन असे उत्तर तिने दिले.

टॅग्स :दीपिका पादुकोणमहाराष्ट्र