Join us
Daily Top 2Weekly Top 5

माला सिन्हांसोबतचा ‘हा’ चिमुकला आहे बॉलिवूडचा अ‍ॅक्शन हिरो, ओळखा पाहू कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 13:21 IST

Mala Sinhaचा एक जुना फोटो व्हायरल होतोय आणि या फोटोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

बॉलिवूडचा एक काळ गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री माला सिन्हा (Mala Sinha) यांना कोण ओळखत नाही. माला सिन्हा हे नाव ऐकताच अनपढ, आँखे, धूल का फूल, दो कलियां, हिमालय की गोद असे सिनेमे डोळ्यांपुढे येतात. तूर्तास माला सिन्हांचा एक जुना फोटो व्हायरल होतोय आणि या फोटोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. होय, माला सिन्हांसोबत या फोटोत एक चिमुकला दिसतोय. हा चिमुकला कोण? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर तो दुसरा कोणी नसून बॉलिवूडचा एक अभिनेता आहे.

होय, काही महिन्यांपूर्वी धर्मेन्द्र यांनी हा फोटो त्यांच्या सोशल अकाऊंटवर शेअर केला होता. या ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट फोटोत माला सिन्हांनी एका चिमुकल्याला प्रेमाने कुशीत घेतलेलं दिसतंय. हा चिमुकला अन्य कुणी नसून बॉबी देओल आहे.

माला सिन्हा 50, 60 आणि 70च्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होत्या.  माला सिन्हा यांचे खरे नाव आल्डा आहे. हिंदी व्यतिरिक्त बंगाली आणि नेपाळी भाषांमध्येही त्यांनी अनेक चित्रपट केले. माला सिन्हा शाळेत जायच्या तेव्हा त्यांच्या मैत्रिणी त्यांना मस्करीत ‘डाल्डा’ म्हणत.  तर मालाचे आई-वडील तिला ‘बेबी’ म्हणायचे, त्यामुळे अनेक मित्र तिला ‘डाल्डा सिन्हा’ आणि ‘बेबी सिन्हा’ म्हणू लागले होते. चित्रपटात काम करण्यापूर्वी त्या रेडिओसाठी गाणी गायच्या. माला दिसायला खूप सुंदर होत्या, म्हणून कोणीतरी त्यांना चित्रपटात काम करण्याचा सल्ला दिला. चित्रपटात काम करण्याचे स्वप्न घेऊन त्या मुंबईत आल्या, पण इथे त्यांना खूप संघर्ष करावा लागला.

टॅग्स :माला सिन्हाबॉबी देओल