Join us  

‘टायटॅनिक’ फेम लिओनार्डो ‘इंडियन’ मॉडेलच्या प्रेमात?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2023 8:02 AM

दोघांचे फोटो लगेचच सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि अफेअरच्या चर्चांना उधाण आले आहे.

टायटॅनिक फेम हॉलिवूड अभिनेता लिओनार्डो डी कॅप्रियो (४८) सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तो वयाने २० वर्षांनी लहान भारतीय वंशाची मॉडेल नीलम गिल (२८) हिला डेट करत असल्याचे सांगितले जात आहे. 

पेज सिक्सच्या रिपोर्टनुसार, कॅप्रियो नुकताच लंडनमधील रेस्टॉरंटमध्ये नीलमसोबत डिनर करताना दिसला, यावेळी त्याची आईदेखील सोबत होती. काही आठवड्यांपूर्वीही दोघे फ्रान्समध्ये कान्स येथील एका हॉटेलमधून एकत्र बाहेर पडताना दिसले होते. दोघांचे फोटो लगेचच सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि अफेअरच्या चर्चांना उधाण आले आहे.

कॅप्रियोचे नाव यापूर्वी मॉडेल गिगी हदीद आणि अभिनेत्री कॅमिला मोरोनशी जोडले गेले होते, तर स्वत:ला ब्रिटिश-पंजाबी मॉडेल म्हणणारी नीलम वयाच्या १४ व्या वर्षापासून मॉडेलिंग करते. तिचा जन्म २७ एप्रिल १९९५ रोजी कोव्हेंट्री, इंग्लंड येथे झाला होता. तिच्या आजी-आजोबांचा जन्म भारतात झाला होता. ती पंजाबमधील शीख कुटुंबातील आहे. ब्रीटनच्या मॉडेलिंग विश्वातील एक प्रसिद्ध नाव आहे. सुमारे दशकापूर्वी, तिने बर्बेरी कॅम्पेनमध्ये सहभागी होणारी पहिली भारतीय मॉडेल बनून इतिहास रचला होता. ती नुकतीच नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या लाँचिंगवेळीही दिसली होती.

 

टॅग्स :लिओनार्डो डिकैप्रियोहॉलिवूडसेलिब्रिटी