Join us
Daily Top 2Weekly Top 5

अक्षर कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात

By कोमल खांबे | Updated: June 21, 2025 09:34 IST

अक्षर कोठारीने लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. बालपणीच्या मैत्रिणीसोबत अक्षय लग्नबंधनात अडकला आहे.

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता विवाहबंधनात अडकला आहे. अभिनेता अक्षर कोठारीने लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. बालपणीच्या मैत्रिणीसोबत अक्षय लग्नबंधनात अडकला आहे. सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट करत अभिनेत्याने ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अक्षरने गुपचूप लग्न केल्याने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

अक्षर कोठारीने बालपणीची मैत्रीण सारिका खासनिस हिच्यासोबत लग्न केलं आहे. लग्नासाठी दोघांनीही अगदी खास लूक केल्याचं दिसलं. अक्षरने थ्री पिस सूट परिधान केला होता. तर त्याची पत्नी सारिका हिने साडी नेसून पारंपरिक लूक केला होता. "तेव्हा, आता आणि नेहमीच...बचपन का प्यार", असं कॅप्शन त्याने फोटोला दिलं आहे. त्याच्या फोटोंवर कमेंट करत चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

अक्षरने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'चाहूल', 'बंध रेशमाचे', 'छोटी मालकीण', 'स्वाभिमान', 'कमला' या मालिकांमध्ये तो दिसला होता. सध्या तो 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. अक्षरचं हे दुसरं लग्न आहे. याआधी त्याने अभिनेत्री मानसी नाईकशी लग्न केलं होतं. पण, लग्नानंतर काही वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला. 

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठी अभिनेतासेलिब्रेटी वेडिंग