Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मुलगी झाली हो' फेम दिव्याला हळद लागली! वडिलांसोबत केला भन्नाट डान्स, बापलेकीच्या नात्याचा भावुक व्हिडिओ

By कोमल खांबे | Updated: February 16, 2025 09:06 IST

'मुलगी झाली हो' दिव्या पुगावकरही बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे. दिव्याची लगीनघटिका समीप आली आहे. नुकतंच तिचा हळदीचा कार्यक्रम पार पडला.

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. नववर्षाच्या सुरुवातीपासूनच अनेक सेलिब्रिटींनी लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. 'मुलगी झाली हो' दिव्या पुगावकरही बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे. दिव्याची लगीनघटिका समीप आली आहे. नुकतंच तिचा हळदीचा कार्यक्रम पार पडला. 

दिव्याने हळदीसाठी खास पिवळ्या रंगाच्या आऊटफिटला पसंती दिली. पिवळ्या रंगाचं स्कर्ट आणि टॉप तिने परिधान केला होता. त्यावर फुलांच्या ज्वेलरीने अभिनेत्रीने साज केला होता. दिव्याच्या हळदीच्या कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. हळदीच्या कार्यक्रमात दिव्याने डान्सही केला. 'गोरी गौरी मांडवाखाली' या गाण्यावर दिव्या थिरकली. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत दिव्या तिच्या वडिलांसोबत भन्नाट डान्स करताना दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरचा आनंदही यात स्पष्ट दिसत आहे. 

'मुलगी झाली हो' मालिकेतून दिव्या घराघरात पोहोचली. सध्या ती लक्ष्मी निवास मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. दिव्याच्या हळदीला लक्ष्मी निवास मालिकेतील कलाकारांनीही हजेरी लावली होती. दिव्या अक्षय घरतसोबत लग्नगाठ बांधणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये आहेत. अक्षय घरत हा फिटनेस मॉडेल असून न्यूट्रिशनिस्ट, प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर म्हणूनही त्याची ओळख आहे.

टॅग्स :टिव्ही कलाकारसेलिब्रेटी वेडिंग