Join us

अंकिता लोखंडेने पती विकी जैनला सर्वांसमोर फेकून मारला बूट, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 12:05 IST

नुकतंच सुरू झालेल्या 'लाफ्टर शेफ २'मध्ये रुबीना दिलैक पासून अंकिता लोखंडे आणि राहुल वैद्य याच्यापर्यंत अनेक सेलिब्रिटी शोमध्ये वेगवेगळे पदार्थ बनवताना दिसत आहेत.

हिंदी टेलिव्हिजनवरील 'बिग बॉस'च्या १८व्या पर्वाने प्रेक्षकांचा निरोप घेताच दोन नवे कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस आले. एकाबाजूला 'लाफ्टर शेफ २' तर दुसऱ्या बाजूला 'सोनी टीव्ही'वर 'सेलिब्रिटी मास्टर शेफ' कार्यक्रम सुरू झाला आहे. सध्या या दोन्ही कार्यक्रमांमध्ये टक्कर पाहायला मिळत आहे. 'लाफ्टर शेफ २'या कार्यक्रमात हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कलाकार वेगवेगळे पदार्थ बनवताना दिसत आहेत. नुकतंच सुरू झालेल्या 'लाफ्टर शेफ २'मध्ये रुबीना दिलैक पासून अंकिता लोखंडे आणि राहुल वैद्य याच्यापर्यंत अनेक सेलिब्रिटी शोमध्ये वेगवेगळे पदार्थ बनवताना दिसत आहेत.

'लाफ्टर शेफ २'च्या अलिकडच्या भागात अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांच्यात नौकझौक पाहायला मिळाली. नुकतंच समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळालं की, कॉमेडियन भारती सिंगने विकीला विचारलं की प्रेमाचा त्याच्यासाठी काय अर्थ आहे. मात्र, विकीऐवजी अंकिताने उत्तर दिलं, "प्रेम ही एक अशी गोष्ट आहे जी खूप सुंदर आहे, त्यात भांडणे देखील असतात". यावर कृष्णा अभिषेकने अंकिताला मध्येच थांबवले आणि म्हणाला, 'तू एक गोष्ट चुकीची बोललीस, की भांडणे 'देखील' असतात नाही तर 'फक्त' भांडणेच होतात'.

यावर विकी मोठ्याने हसायला लागला. तर अंकिता म्हणाली की त्यांच्यातील भांडणे देखील त्यांच्या प्रेमाचा एक भाग आहेत. यानंतर विकी जैनने अंकितावरील त्याच्या प्रेमाबद्दल एक टिप्पणी केली, ज्यामुळे अंकिता नाराज झाली. तो म्हणाला, "अनेकदा मला वाटतं की कदाचित हे प्रेम नसून ते लादलं गेलं". विकीच्या या विधानानंतर अंकिता सेटवरून निघाली. यानंतर विकी जैननं तिला मनवण्याचा प्रयत्न केला. यानंतर, कृष्णा अभिषेकने अंकिताला एक बूट दिला आणि गंमतीने म्हणाला, 'त्याच्या जेवण्याची वेळ झाली आहे. अंकिताने विकीवर बूट फेकला आणि म्हणाली, "हे घे, खा". यानंतर तिने मस्करीत विकीच्या गालातही मारली.

अंकिता लोखंडे ही फिल्मी जगतातील एक लोकप्रिय नाव आहे. जी 'पवित्र रिश्ता', 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' आणि 'वीर सावरकर' सारख्या शो आणि चित्रपटांसाठी ओळखली जाते. तिचे लग्न उद्योगपती विकी जैनशी झाले आहे, जो त्याच्या पत्नीसह 'बिग बॉस १७' मध्ये सहभागी झाल्यानंतर घराघरात लोकप्रिय झाला. सलमान खानच्या वादग्रस्त रिअॅलिटी शोमध्ये अंकिता आणि विकी अनेकदा एकमेकांशी भांडताना दिसले होते.

टॅग्स :अंकिता लोखंडे