Join us

'लक्ष्मी निवास' उत्कंठावर्धक वळणावर, श्रीनिवासनं कुटुंबासाठी स्वीकारली रिक्षा चालकची नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 12:54 IST

'लक्ष्मी निवास' मालिकेने (Lakshmi Niwas Serial) कमी कालावधीत रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतील कुटुंबाला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे. दरम्यान आता मालिकेत उत्कंठावर्धक वळण आले आहे.

'लक्ष्मी निवास' मालिकेने (Lakshmi Niwas Serial) कमी कालावधीत रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतील कुटुंबाला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे. दरम्यान आता मालिकेत उत्कंठावर्धक वळण आले आहे. नोकरी गेल्यानंतर नवीन वर्षाची सुरुवात म्हणून श्रीनिवास नवीन काम करण्याचा निर्णय घेऊन रिक्षा चालवायला सुरुवात करणार आहे. 

नोकरी गेल्यानंतर श्रीनिवास खचून न जाता कुटुंबासाठी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतो. पण दिवसाच्या शेवटी त्याला रिक्षा मालकाला ठराविक रक्कम द्यावी लागते ते देऊन श्रीनिवास आपली पहिली कमाई घरी आणतो, पण लक्ष्मीपासून त्याला आपली नोकरी लपवावी लागते. पहिल्यांदाच असं काम केल्यामुळे श्रीनिवासचा खांदा आणि पाठ दुखू लागलेय. तसेच उन्हामुळे चेहेराही काळवंडलाय. लक्ष्मीला श्रीनिवासमध्ये झालेल्या बदलांची जाणीव होते आणि तो काहीतरी लपवत असल्याचा तिला संशय येतो. 

जयंत जान्हवीसमोर देणार ही कबुली

दुसरीकडे निवडणूक प्रचारादरम्यान गुणाजी श्रीनिवासला रिक्षा चालवताना पाहतो. त्यामुळे गुणाजीच्या मनात शंका निर्माण होते. गुणाजी नंतर श्रीनिवासच्या घरी जातो, पण श्रीनिवास अजूनही आपल्या जुन्या नोकरीतच असल्याचे त्याला पटवून देतो. गुणाजी श्रीनिवासला आपल्या मुलीच्या साखरपुड्याचं निमंत्रण देणार आहे. दुसरीकडे, जयंतने कधीही पारंपरिक पद्धतींनी गुढीपाडवा साजरा केला नाहीये, पण जान्हवी मात्र प्रत्येक गोष्टीचे बारकाईने पालन करते. तो जान्हवी समोर कबूल करतो की त्याचे प्रेम वेगळ्या प्रकारचे आहे, पण कोणत्याही परिस्थितीत तो तिच्या पाठीशी उभा राहण्याचे वचन देतो. 

लक्ष्मी श्रीनिवासचा करते पाठलाग

दरम्यान, सिद्धूलाही भावनाकडून आपली खरी ओळख लपवल्याची अपराधी भावना वाटते. तो भावनाला सांगण्याचा विचार करतो की तोच गाडे पाटील आहे, पण त्याआधीच त्याच्या घरच्यांनी त्याचा साखरपुडा ठरवला आहे. लक्ष्मी श्रीनिवासचा पाठलाग करते कारण तिला सतत वाटतंय की श्रीनिवास काहीतरी लपवत आहे. लक्ष्मी आपल्या मनातील गोष्ट सिद्धूसमोर मांडते की तिलाही काहीतरी काम हवं आहे. आता काय होईल जेव्हा श्रीनिवास सत्य लक्ष्मीसमोर येईल? जान्हवी अजून किती काळ जयंतला समजून घ्यायचा प्रयत्न करेल? सिद्धू आपल्या मनातल्या गोष्टी भावनाला सांगेल?  या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरासाठी मालिका पाहावी लागेल.

टॅग्स :झी मराठी