Join us
Daily Top 2Weekly Top 5

लॅक्मे फॅशन वीकच्या रॅम्पवर ईशा देओल संतापते तेव्हा...!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 13:22 IST

लॅक्मे फॅशन वीक फेस्टिव-वींटरच्या अखेरच्या दिवशी अनेक सेलिब्रिटींनी रॅम्प वॉक केला.  हेमा मालिनी व तिची मुलगी अभिनेत्री ईशा देओल तख्तानी या दोघी मायलेकीही रॅम्पवर दिसल्या.

लॅक्मे फॅशन वीक फेस्टिव-वींटरच्या अखेरच्या दिवशी अनेक सेलिब्रिटींनी रॅम्प वॉक केला. करिना कपूरने मोनिशा जससिंहचा ड्रेस घालून रॅम्पवॉक केला तर बिपाशा बासू, दीया मिर्झा, करिश्मा कपूर आणि राजकुमार राव यासारखे कलाकाराही आपआपल्या आवडीच्या डिझाईनरसाठी रॅम्पवर उतरले. याचदरम्यान हेमा मालिनी व तिची मुलगी अभिनेत्री ईशा देओल तख्तानी या दोघी मायलेकीही रॅम्पवर दिसल्या. दोघींनीही संजुक्ता दत्ताचा पारंपरिक ड्रेस परिधान केला होता. यावेळी हेमा मालिनीने पारंपरिक साडी तर ईशाने लहंगा घातला होता. ईशाने आपल्या सोशल अकाऊंटवर या रॅम्पवाकचे अनेक फोटो शेअर केले होते. ‘माझी सगळ्यांत कम्फर्टेबल पार्टनर... आईसोबत रॅम्प वॉक...डिझाईनर संयुक्ता दत्तला शुभेच्छा’, असे तिने लिहिले. पण याचदरम्यान आयोजकांना ईशाच्या संतापाचाही सामना करावा लागला. 

 त्याचे झाले असे की, रॅम्पवॉकदरम्यान एका पत्रकाराने हेमा मालिनीनंतर ईशाला प्रश्न विचारला. पण शोच्या आयोजकांनी या पत्रकाराला मध्येच थांबवत, येथे मीडियाकडून कुठलाही प्रश्न विचारला जाणार नाही, येथे केवळ फोटो सेशन होईल, असे जाहीर केले. आयोजकाची ही गोष्ट ईशाला चांगलीच खटकली. ती जाम संतापली अन् हातातला माईक आयोजकांच्या हाती देत, याचे उत्तरही तुम्हीच द्या, म्हणत ती तणतणत निघून गेली. जाताना आई हेमा मालिनी हिलाही ती सोबत घेऊन गेली.ईशा देओल संतापण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही अनेकदा तिचे हे रूप पाहायला मिळाले आहे. याआधी ‘प्यारे मोहन’च्या सेटवर तिने अमृता रावच्या थोबाडीत हाणली होती. अभिनेते धर्मेंद्र व हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओल लवकरच कमबॅक करणार आहे. ती 'केकवॉक' या लघुपटात पुनरागमन करणार आहे. 

 

टॅग्स :हेमा मालिनी