Join us
Daily Top 2Weekly Top 5

'लागीर झालं' फेम शीतली आणि अरुंधतीमध्ये'चं आहे खास नातं; जाणून घ्या याविषयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 11:11 IST

शिवानी बावकरचं 'अरुंधती' या दोघींमधील कनेक्शन ऐकल्यावर तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल.

छोट्या पडद्यावर दररोज असंख्य मालिकांची रेलचेल असल्याचं पाहायला मिळतं. परंतु, या मालिकांच्या गर्दीत अशा काही मालिका असतात ज्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. अलिकडेच झी मराठीवर  'लागीर झालं जी' मालिकेतून घराघरात पोहोचलेली शीतली उर्फ शिवानी बावकरची नवी मालिका लवंगी मिरची ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आज शिवानी बावकर आपला वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने आम्ही तुम्हाला शितली आणि 'आई कुठे काय करते' मालिकेतील अरुंधती यांच्यातील खास नात्याबाबत सांगणार आहोत. 

'लागीर झालं जी' मालिकेतून शीतली सर्वांच्या भेटीला आली होती. अभिनेत्री शिवानी बावकरने ही भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे शिवानीला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. 'आई कुठे काय करते' या मालिकेत अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकरही अरुंधतीची भूमिका साकारत आहेत. तर, अभिनेत्री  शिवानी बावकर 'लवंगी मिरची'मध्ये अस्मिची भूमिकेत पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे शिवानी आणि मधुराणी यांच्यात एक नातं असून फार मोजक्या जणांना ते ठावूक आहे.

काय आहे अरुंधती आणि  शिवानीचं नात? अरुंधती म्हणजेच मधुराणी एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक प्रशिक्षकदेखील आहे. मधुराणी आणि तिचे पती प्रमोद प्रभुलकर यांची मिरॅकल्स अ‍ॅक्टींग ही अ‍ॅकॅडमी चालवतात. त्यांच्या या अ‍ॅकॅडमीमध्ये आतापर्यंत अनेक नवोदित कलाकारांनी अभिनयाचे धडे गिरवले आहेत.  शिवानी बावकर हे तिची विद्यार्थिंनी आहे.  याच संस्थेत तिने अभिनयाचे धडे गिरवले आहेत. मधुराणीच्या संस्थेमधून आतापर्यंत  ह्रता दुर्गुळे,  गिरिजा प्रभू, किरण गायकवाड, निखिल चव्हाण या कलाकारांनी अभिनय शिकला आहे.

टॅग्स :शिवानी बावकरमधुराणी प्रभुलकरआई कुठे काय करते मालिका