लागिर झालं जी मालिकेतील हा अभिनेता नुकताच लग्नाच्या बंधनात अडकला आहे. या कलाकाराचे नाव आहे किरण दळवी. किरण दळवी याने लागिर झालं जी मालिकेत गोट्याची भूमिका साकारली होती. त्याची ही भूमिका काहीशी निगेटिव्ह असली तरी ती प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली. या मालिकेव्यतिरिक्त किरणने टोटल हुबलक या आणखी एका मालिकेतून काम केले आहे. मूळचा महाबळेश्वरचा असलेला किरण दळवी अभिनयासोबतच लेखन आणि दिग्दर्शनाचे कामही करतो.
अभिनेता किरण दळवी हा कलाकार शुक्रवारी १४ ऑगस्ट रोजी मोनाली गायकवाड हिच्यासोबत लग्नबेडीत अडकला आहे. लग्नाचे खास फोटो त्याने सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. लग्नाचे फोटो शेअर करताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
रंगकर्मी थेटर्स, महाबळेश्वर मधून अनेक नाट्यस्पर्धा त्याने गाजवल्या आहेत. ‘मोजमाप दीड इंच’ या विनोदी नाटकाचे दिग्दर्शन स्वतः किरण दळवी याने निभावले होते.