Join us  

लगीन घटीका समीप आली...!! स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णीच्या केळवणाचे फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2023 11:22 AM

Swanandi Tikekar And Ashish Kulkarni : स्वानंदी आणि आशिष यांच्या केळवणाला नुकतीच सुरूवात झाली आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मराठीत सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. लवकरच अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे, मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे लग्नगाठ बांधणार आहेत. याशिवाय स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णीदेखील लवकरच लग्न करणार आहेत. दरम्यान आता त्यांच्या प्री व्हेडिंग फंक्शनला सुरुवात झाली आहे. स्वानंदी आणि आशिष यांच्या केळवणाला नुकतीच सुरूवात झाली आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

स्वानंदी टिकेकरने इंस्टाग्रामवर केळवणाचा फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने लिहिले की, द काउंटडाउन बिगेन्स!!! केळवणाची सुरुवात तुमच्यापासून झाली आता लाइन लागली आहेच. माझ्या प्रिय व्यक्ती तुमची मी आभारी आहे.हे सर्व माझ्या बाजूने तुम्हांपासून सुरू झाले! सुकन्या मोने, हॅशटॅग दिल्याबद्दल आभारी आहे. #anandi स्वानंदीच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळत आहे. 

आशिष कुलकर्णी आणि स्वानंदी हे दोघे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. आशिष कुलकर्णीने 'इंडियन आयडॉल १२' गाजवले होते. आपल्या मनमिळाऊ स्वभावाने त्याने सर्वांचंच मन जिंकलं होतं. आशिष कुलकर्णी हा गायक असून देशविदेशात तो त्याच्या गाण्याचे कार्यक्रम करतो. याशिवाय मराठी चित्रपटातील गाणीही त्याने गायलीत. त्यामुळे मराठी इंडस्ट्रीत आशिषने स्वतःची ओळख बनवली आहे. आशिष उत्तम गायक आहेच पण स्वानंदीलाही आईकडून गाण्याचा वारसा मिळालाय. स्वानंदी गेल्या अनेक वर्षांपासून छोट्या पडद्यावर काम करत आहे. आभाळमाया या मालिकेत तिने बालकलाकाराची भूमिका साकारली आहे. झी मराठीच्या अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई या मालिकेतून सुकन्या कुलकर्णी यांच्यासोबत प्रमुख भूमिकेत झळकली होती. 

टॅग्स :स्वानंदी टिकेकर