Join us
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णा अभिषेकला 'द कपिल शर्मा' सोडून करायचे आहे हे काम, वाचून तुम्हाला आवरणार नाही तुमचे हसू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 18:59 IST

कृष्णाला द कपिल शर्मा शो हा कार्यक्रम सोडून एक वेगळेच काम करण्याची इच्छा असल्याचे त्याने नुकतेच या कार्यक्रमात सांगितले आहे.

ठळक मुद्देकृष्णा अभिषेकने मस्करीत सैफला सांगितले की, त्याला तैमुरची नॅनी बनण्याची इच्छा असून तो तैमुरसोबतच त्याच्या वडिलांची म्हणजेच सैफची देखील काळजी घेईल.

द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा आवडता कार्यक्रम असून या कार्यक्रमातील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या कार्यक्रमामध्ये कृष्णा अभिषेक एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसतो. पण त्याला हा कार्यक्रम सोडून एक वेगळेच काम करण्याची इच्छा असल्याचे त्याने नुकतेच या कार्यक्रमात सांगितले आहे. कृष्णाला कोणते काम करायचे हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.

कृष्णा अभिषेकला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून द कपिल शर्मा शो मध्ये तो साकारत असलेली सपना ही भूमिका त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडते. पण त्याला आता हा कार्यक्रम सोडायचा असल्याचे त्याने याच कार्यक्रमाच्या एका भागादरम्यान नुकतेच सांगितले. पण त्याला हा कार्यक्रम खराखुरा सोडायचा नसून त्याने ही गोष्ट मस्करीत म्हटली आहे. कृष्णा अभिषेकला द कपिल शर्मा शो हा कार्यक्रम सोडून चक्क करिना कपूर आणि सैफ अली खानच्या लाडक्या तैमुरची नॅनी बनण्याची इच्छा आहे.

द कपिल शर्मा शो मध्ये नुकतीच सैफ अली खानने हजेरी लावली होती. या कार्यक्रमात तो त्याच्या जवानी जानेमन या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आला होता. या कार्यक्रमात कृष्णा अभिषेकने मस्करीत सैफला सांगितले की, त्याला तैमुरची नॅनी बनण्याची इच्छा असून तो तैमुरसोबतच त्याच्या वडिलांची म्हणजेच सैफची देखील काळजी घेईल. कृष्णा अभिषेकचे हे वक्तव्य ऐकून उपस्थितांना त्यांचे हसू आवरत नव्हते. 

सैफचा जवानी जानेमन हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटात त्याच्यासोबतच अलाया फर्निचरवाला आणि तब्बू महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाला समीक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला असून बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने आतापर्यंत चांगले कलेक्शन केले आहे. 

टॅग्स :द कपिल शर्मा शोसैफ अली खान जवानी जानेमनतैमुर